आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली कारकीर्द:गोल्डन डकवर  कोहली म्हणाला - मला असहाय वाटत होते, कोहली 12 सामन्यांत केवळ 216 धावा करू शकला

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचा यंदाचे सत्र बंगळुरूच्या विराट कोहलीसाठी खूपच वाईट गेले आहे. तो तीन वेळा गोल्डन डक ठरला. कोहलीला १२ सामन्यांत केवळ २१६ धावा करता आल्या असून त्यात केवळ एक अर्धशतक आहे. त्याची सरासरी केवळ १९.६३ आणि स्ट्राइक रेट १११.३४ होता. हैदराबादविरुद्ध तो शून्यावर बाद झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. डक मिळाल्यावर कोहली का हसतोय याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता त्याने याचा खुलासा केला आहे. कोहली म्हणाला, “माझ्या कारकीर्दीत असे कधीच घडले नव्हते. मला असहाय वाटत होते. या खेळात मला जे काही बघायचे होते ते मी पाहिल्यासारखे वाटले.’

वेगवेगळ्या प्रकारच्या गोलंदाजांकडून तो बाद होत आहे ही चिंतेची बाब असल्याचे मत माजी कॅरेबियन वेगवान गोलंदाज इयान बिशपने व्यक्त केले. कोहली म्हणाला, ‘तो अशा सल्ल्यांकडे लक्ष देत नाही आणि टीकाकारांपासून लांब राहतो. टीकाकार माझी जागा घेऊ शकत नाहीत. मी ज्या गोष्टी अनुभवू शकतो त्या गोष्टी ते अनुभवू शकत नाहीत. अशा प्रकारचा आवाज बंद करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तेव्हा टीव्ही म्यूट करता किंवा लोक काय म्हणतात याकडे लक्ष देत नाही. मीही या दोन्ही गोष्टी करतो.’ दरम्यान, कोहलीला आशा आहे की, त्याचा मित्र आणि द. आफ्रिकेचा सुपरस्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स पुढील सत्रात पुनरागमन करू शकतो. कोहली म्हणाला, “मला डिव्हिलियर्सची खूप आठवण येते. मी त्याच्याशी सतत बोलतो. मला खात्री आहे की, तो पुढच्या वर्षी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बंगळुरूमध्ये सामील होईल.’

बातम्या आणखी आहेत...