आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या १५ व्या सत्रातील १५ वा सामना अशा दोन संघांमध्ये खेळला जात आहे, ज्यांच्या कर्णधारांना तज्ज्ञांनी भावी भारतीय संघाचा कर्णधार म्हटले आहे. दोघांनीही आपल्या खेळाने ते सिद्ध केले आहे. हे आहेत के.एल. राहुल व ऋषभ पंत. राहुलकडे लखनऊ सुपर जायंट्सच्या नव्या संघाचे नेतृत्व आहे, तर पंतने दिल्लीचे कर्णधारपद स्वीकारले आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही कर्णधारांच्या रणनीती कौशल्याची चाचणी घेतली जाईल. या सामन्यात राहुल व पंतला पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागले. यंदा लखनऊ व दिल्ली पहिल्यांदाच भिडणार आहेत.
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अष्टपैलू बनतोय
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएलमध्ये बुधवारी जबरदस्त कामगिरी केली. त्याने दबावातही चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर खेळपट्टीवर उतरला आणि संपूर्ण सामन्यांचे चित्र बदलून टाकले. प्रथम त्याने मुंबईचे दोन महत्त्वाचे खेळाडू ईशान व सूर्यकुमारला बाद केले. त्यानंतर तुफानी फलंदाजी करत ३७३.३३ च्या स्ट्राइक रेटने नाबाद ५६ धावा ठोकल्या. तो गेल्या काही सामन्यांपासून अष्टपैलू म्हणून पुढे येत आहे. गेल्या आयपीएलमध्येही त्याने काही चांगल्या खेळी केल्या होत्या. व्यंकटेश अय्यरने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
धावफलक, नाणेफेक कोलकाता (गोलंदाजी) मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६ रोहित झे. बिलिंग्ज गो. यादव ०३ १२ ०० ० ईशान झे. श्रेयस गो. कमिन्स १४ २१ ०१ ० ब्रेविस यष्टी. बिलिंग्ज गो. वरुण २९ १९ ०२ २ यादव गो. बिलिंग्ज गो. कमिन्स ५२ ३६ ०५ २ तिलक वर्मा नाबाद ३८ २७ ०३ २ केरॉन पोलार्ड नाबाद २२ ०५ ०० ३ अवांतर : ३. एकूण : २० षटकांत ४ बाद १६१ धावा. गडी बाद क्रम : १-६, २-४५, ३-५५, ४-१३८. गोलंदाजी : उमेश यादव ४-०-२५-१, आर. सलाम ३-०-१८-०, पॅट कमिन्स ४-०-४९-२, सुनील नरेन ४-०-२६-०, वरुण चक्रवर्ती ४-०-३२-१, आंद्र रसेल १-०-९-०. कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६ रहाणे झे. सॅम्स गो. मिल्स ०७ ११ ०० ० व्यंकटेश अय्यर नाबाद ५० ४१ ०६ १ श्रेयस झे. तिलक गो. सॅम्स १० ०६ ०२ ० बिलिंग्ज झे. थंम्पी गो. अश्विन १७ १२ ०० २ राणा झे. सॅम्स गो. अश्विन ०८ ०७ ०० १ रसेल झे. ब्रेविस गो. मिल्स ११ ०५ ०१ १ पॅट कमिन्स नाबाद ५६ १५ ०४ ६ अवांतर : ३. एकूण : १६ षटकांत ५ बाद १६२ धावा. गडी बाद क्रम : १-१६, २-३५, ३-६७, ४-८३, ५-१०१. गोलंदाजी : बासिल थंम्पी ३-०-१५-०, डॅनिल सॅम्स ३-०-५०-१, जसप्रीत बुमराह ३-०-२६-०, मिल्स ३-०-३८-२, तिलक वर्मा १-०-६-०, मुरूगन अश्विन ३-०-२५-२.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.