आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI vs KKR सामना आज:विजयाची लय कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरणार मॉर्गनची टीम, मुंबईकडे सलग चौथ्यांदा कोलकाताला हरवण्याची संधी

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीयूष चावला आता करु शकतो मुंबईकडून पदार्पण

सलामीच्या पराभवातून सावरलेला पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ आता आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक आहे. याच विजयाच्या इराद्याने रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईचा संघ चेन्नईच्या मैदानावर उतरणार आहे. आयपीएलच्या पाचव्या सामन्यात आज मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि इयान माॅर्गनचा कोलकाता नाइट रायडर्स संघ समाेरासमाेर असतील. गत सामन्यातील विजयाने कोलकाता संघ फाॅर्मात आहे. त्यामुळे आपली विजयी लय कायम ठेवत कोलकाता संघ आता सलामीला पराभूत झालेल्या मुंबईवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. गत सामन्यात कोलकाता टीमने रविवारी डेव्हिड वाॅर्नरच्या हैदराबाद संघावर १० धावांनी मात केली. या सामन्यात नितीश राणाची खेळी कौतुकास्पद ठरली. याशिवाय राहुल त्रिपाठीनेही अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात माेलाचे योगदान दिले. त्यामुळे आता कोलकाता संघाच्या दुसऱ्या विजयाचीही मदार या दोन्ही युवा फलंदाजांवर असेल.काेलकाता संघासाठी सुमार गोलंदाजी हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. गत सामन्यात हरभजन सिंगला एकच आेव्हर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, फलंदाजीच्या बळावर कोलकाता टीममध्ये माेठी धावसंख्या उभी करण्याची प्रचंड क्षमता आहे. फलंदाजांची मजबूत अशी फळी संघाकडे आहे. मुंबईचा कर्णधार राेहित शर्मा हा काेलकाेता संघाविरुद्ध सर्वात यशस्वी फलंदाज ठरलेला आहे. त्याच्या नावे या टीमविरुद्ध सर्वाधिक ९३९ धावांची नाेंद आहे.

पीयूष चावला आता करू शकताे मुंबईकडून पदार्पण
मुंबई इंडियन्स संघाकडून आता लेग स्पिनर पीयूष चावला पदार्पण करण्याची शक्यता आहे. सलामी सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. या सामन्यात राहुल चहर हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला हाेता. पीयूषने आतापर्यंत आयपीएलच्या सर्वच सत्रांमध्ये खेळण्याची विक्रमी कामगिरी केलेली आहे. ताे २०१४ ते २०१९ पर्यंत कोलकाता संघासोबत करारबद्ध हाेता. त्याच्या नावे १५६ बळींची नाेंद आहे.

मुंबईविरुद्ध केकेआर सपशेल अपयशी
आयपीएलमध्ये कोलकाता संघाला अद्याप मुंबई संघाविरुद्ध समाधानकारक अशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचे एकूण २७ सामने झाले. यातील फक्त सहाच सामन्यांत कोलकाता संघ विजेता ठरला. मुंबईने २१ सामन्यांत विजयाची नोंद केलेली आहे. त्यामुळे आता हीच विजयाची लय कायम ठेवण्याचा मुंबई टीमचा प्रयत्न असेल. गत १२ सामन्यांत काेलकाता टीमला एक विजय संपादन करता आला.

खांद्याच्या दुखापतीनंतरही आता पुढील सामन्यात हार्दिक करणार गोलंदाजी : जहीर खान
सध्या वर्कलाेड मॅनेजमेंटमुळे गत सामन्यात हार्दिक पांड्याला गाेलंदाजीची संधी मिळाली नाही. फिजिओने दिलेल्या माहितीनंतर आम्ही हा निर्णय घेतला. त्याच्या खांद्यालाही दुखापत झालेली आहे. मात्र, ही दुखापत गंभीर नाही. त्यामुळेच आता हार्दिक हा खांद्याच्या दुख‌ापतीनंतरही गाेलंदाजी करताना दिसणार आहे, अशी माहिती टीमचा संचालक जहीर खानने दिली. त्यामुळे आता त्याच्या गाेलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.

डिकॉक खेळणार; लिनला विश्रांती
मुंबई इंडियन्स संघाने नेहमीप्रमाणे आयपीएलचा आपला सलामी सामना गमावला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजयी पताका फडकवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यादरम्यान आता संघामध्ये डिकाॅक हा दमदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याचे क्वाॅरंटाइन पूर्ण झाले आहे. गत दाेन सत्रांमध्ये त्याने राेहित शर्मासाेबत संघाला चांगली सुरुवात करून दिली हाेती. त्यामुळे आता डिकाॅकच्या सहभागाने पहिल्या सामन्यात ४९ धावांची खेळी करणाऱ्या ख्रिस लीनला विश्रांती देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...