आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्ले-ऑफमध्ये पोहचण्याच्या कोलकाताच्या आशा कायम:'करो किंवा मरो'चा सामना कोलकाताने जिंकला, हैदराबादचा पराभव, आंद्रे रसेलचा चमकदार खेळ

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2022 च्या 'करो किंवा मरो' च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 54 धावांनी पराभव करून प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. आंद्रे रसेलने 28 चेंडूत 49 धावा केल्या. सॅम बिलिंग्सने 34 धावा केल्या.

प्रत्युत्तरात एसआरएच संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 123 धावा करता आल्या. अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावा केल्या. रसेलनेही 3 विकेट्स घेत बॉलसह आपली ताकद दाखवली.

सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या निकालासह KKR चे 13 सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकावा लागेल आणि इतर साखळी सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने जावेत यासाठी इतर संघाच्या गुणांच्या गणितावर अवलंबुन राहावे लागेल. दुसरीकडे SRH संघ या पराभवानंतरही शर्यतीत आहे. त्याचे 12 सामन्यांत 10 गुण आहेत. SRH ला देखील शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक आहे आणि उर्वरित सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने येणे आवश्यक आहे.

सामन्याचे हायलाईट्स

वरुणने घेतली अभिषेकची विकेट

डावाच्या 12व्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्याची विकेट वरुण चक्रवर्तीने घेतली. सुनीलला निकोलस पूरनची विकेट मिळाली. एसआरएचची पाचवी विकेट एडन मार्करामच्या रूपाने पडली. त्याने 25 चेंडूत 32 धावा केल्या आणि उमेश यादवच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरची विकेट आंद्रे रसेलने घेतली.

केकेआरची खराब सुरुवात

व्यंकटेश अय्यरला मार्को यानसेनने 7 धावांवर बोल्ड केले. नितीश राणा 26 धावा करून उमरान मलिकच्या चेंडूवर शशांक सिंगने झेलबाद झाला. त्याच षटकात उमरानने अजिंक्य रहाणेलाही बाद केले. उमरानने त्याच्या पुढच्या षटकात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची विकेट घेतली.

रिंकू सिंग एलबीडब्ल्यू आऊट

टी. नटराजनच्या चेंडूवर रिंकू सिंग एलबीडब्ल्यू आऊट झाला. अंपायरने आऊट दिल्यानंतर रिंकू इतर बॅट्समन बिलिंग्सशी रिव्ह्यू घ्यायचा की नाही यावर चर्चा करत होता. तोपर्यंत 15 सेकंद निघून गेले होते. रिंकूला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या मुद्द्यावरून पंच आणि दोन्ही फलंदाजांमध्ये काही काळ वादावादी झाली. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर सॅम बिलिंग्ज 34 धावा काढून बाद झाला.

लीगमधील दोन्ही संघांच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, SRH ने 11 सामने खेळले आहेत आणि 5 सामने जिंकले आहेत. या सामन्यातील विजयामुळे संघाचा प्ले-ऑफसाठीचा दावा बळकट होईल. दुसरीकडे, केकेआर आज पराभूत झाल्यास अंतिम-4 शर्यतीतून बाहेर पडेल. KKR ने आतापर्यंत 12 सामने खेळून 5 सामने जिंकले आहेत आणि त्यांचा निव्वळ धावगती -0.057 आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

कोलकाता : व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी आणि वरुण चक्रवर्ती.

हैदराबाद : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.

बातम्या आणखी आहेत...