आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई Vs कोलकाता:कोलकाताची मुंबईवर मात, कमिन्सने केली कमाल 16 व्या षटकात सामना फिरवला, 6 चेंडूत काढल्या 35 धावा!

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमिन्सने साकारले आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक

IPL च्या 15 व्या सीझनमध्ये 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. विजयाचा शिल्पकार पॅट कमिन्स ठरला. त्याने 15 चेंडूत 56 धावा केल्या व पराभवाच्या खाईत सापडलेल्या संघाला 16 व्या षटकातच विजय मिळवून दिला. त्याने या षटकात केवळ 6 चेंडूतच 35 धावा केल्या हे विशेष! पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज हा सामना झाला.

सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोलकाताच्या पॅट कमिन्सने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. व्यंकटेश अय्यरनेही 50 धावांची खेळी खेळली. या विजयासह केकेआरचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे तर मुंबईचा हा सलग तिसरा पराभव आहे.

101 धावांत झाला होता निम्मा संघ बाद

162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचे 13.1 षटकात 101 धावांवर 5 गडी बाद झाले होते. येथून कमिन्सचे तुफान खेळीला सुरूवात केली त्यामुळे कोलकाताच्या संघाने अवघ्या 16 षटकांत लक्ष्य गाठले.

कमिन्सने केली राहूलच्या विक्रमाची बरोबरी

15 चेंडूत 56 धावा करणाऱ्या कमिन्सने 14 चेंडूत 50 धावा पूर्ण करत के.एल. राहुलच्या 4 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. राहुल 2018 च्या आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना त्याने दिल्लीविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले.

तो विक्रम युवराजच्या नावे

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने 2007 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध केवळ 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. युवीने त्या डावात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले होते.

लक्ष्य गाठताना कोलकाताची कसरत

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 161 धावा केल्या आणि कोलकाता संघाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले. हे लक्ष्य कोलकाताने 16 व्या षटकातच गाठले.

धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात संथ झाली. कोलकाताचा सलामीवीर रोहित शर्मा हा झेलबाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या 12 होती. त्यानंतर 35 धावसंख्येवर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरही बाद झाला. संघाची 67 धावसंख्या असताना तिसरा गडी बाद झाला. तर 83 धावसंख्या असताना 4 था गडी बाद झाला. त्यानंतर 101 धावसंख्येवर 5 वा गडी बाद झाला. 13 षटकाच्या खेळात लक्ष्य गाठताना कोलकाताच्या फलंदाजांना मोठी कसरत करावी लागली त्यांचे फलंदाज ठाराविक अंतराने बाद होत गेले.

रहाणे-अय्यर फ्लॉप

कोलकाताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे अवघ्या 7 धावा करून बाद झाला. त्याने 11 चेंडूंचा सामना केला. टायमल मिल्सने रहाणेची विकेट घेतली. त्याचवेळी श्रेयस अय्यर अवघ्या 10 धावा करून बाद झाला. डॅनियल सॅम्सने त्याचा बळी घेतला.

मुंबईने केल्या 161 धावा

प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरूवात संथ झाली. त्यांचा पहिला गडी 12 धावसंख्येवर बाद झाला. कोलकाताच्या उमेश यादवने मुंबईचा कर्णधार रोहीत शर्माची विकेट घेतली.

तत्पुर्वी केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतरही मुंबई संघाने 20 षटकात 161 धावा केल्या. आयपीएल 2022 मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या सूर्य कुमार यादवने या सामन्यात अत्यंत स्फोटक खेळ केला. त्याने अवघ्या 36 चेंडूत 52 धावा केल्या.

त्याला टिळक वर्माची मोलाची साथ लाभली. टिळकने अवघ्या 27 चेंडूत 38 धावा केल्या. शेवटच्या षटकात पोलार्डने आपल्या बॅटची करामत दाखवली आणि त्याने 5 चेंडूंचा सामना करत 22 धावा कुटल्या. त्याचा स्ट्राइक रेट 440.00 होता.

रोहितही ठरला फ्लॉप

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 12 चेंडूत अवघ्या 3 धावा केल्या, त्याला उमेश यादवने बाद केले. उमेशने पाचव्यांदा रोहितला बाद केले.

इशानची बॅट चालली नाही

आयपीएल लिलावात 15.25 कोटींना विकला गेलेला इशान किशन कोलकाताविरुद्ध काही धडाकेबाज कामगिरी करू शकला नाही. किशनने संथ खेळ केला. त्याने 21 चेंडूत 14 धावा केल्या. आयपीएल 2022 मध्ये पहिला सामना खेळत असलेल्या पॅट कमिन्सने त्याला बाद केले.
डेवाल्ड ब्रेविसची छोटी पण चांगली खेळी

डेवाल्ड ब्रेविस (बेबी एबी) पहिला सामना खेळला. त्याने 18 चेंडूत 29 धावा केल्या. वरुण चक्रवर्तीचा तो बळी ठरला. त्याने 29 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 152. 63 होता.

पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले होते पण मुंबईच्या संघाला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर कोलकाता संघ 3 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत प्रथम स्थानावर पोहचला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने राजस्थान रॉयल्सला मागे टाकून अव्वल क्रमांक गाठला.

बातम्या आणखी आहेत...