आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022:कोलकात्याच्या विजयाने प्लेऑफच्या आशा कायम, संघाचा सहावा विजय; हैदराबाद टीमवर 54 धावांनी मात

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंद्रे रसेलची नाबाद ४९ धावांसह शानदार तीन बळींची कामगिरी
सामनावीर आंद्रे रसेलने (नाबाद ४९ धावा, ३ बळी) अष्टपैलू खेळीच्या बळावर गत उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला शनिवारी आयपीएलमध्ये सहावा विजय मिळवून दिला. यासह कोलकाता संघाने करा वा मराच्या सामन्यात दणदणीत विजयाची नाेंद करून आयपीएलच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. या सामन्यातील पराभवाने कोलकाता संघाला मोठा धक्का बसणार होता. रसेलच्या शानदार खेळीच्या बळावर कोलकाता संघाने लीगमधील आपल्या १३ व्या सामन्यात विलियम्सनच्या सनरायझर्स हैदराबाद टीमला धूळ चारली. कोलकाता संघाने ५४ धावांनी सामना जिंकला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात हैदराबाद टीमसमोर विजयासाठी १७८ धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला ८ गडी गमावत १२३ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. मार्करामने ३२ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार खेळीने टीमला पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार विलियम्सनसह (९) पाच फलदंाज एकेरी धावावर बाद झाले.

गत उपविजेत्या कोलकाता संघाकडून रसेलने तीन, टीम साऊथीने दोन, उमेश यादव, सुनील नरेन व वरुणने प्रत्यकेी एक बळी घेतला. यासह कोलकाता संघाला लीगमध्ये विजयी षटकार मारता आला. दुसरीकडे हैदराबाद संघाला सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता रसेलने शानदार खेळीतून आपल्या कर्णधार श्रेयस अय्यरला शतकी सामन्यात विजय मिळवून दिला.

एका विजयाने कोलकाता संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश होणार निश्चित
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाला प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. यापासून कोलकाता संघ आता एका पावलावर आहे. यासाठी कोलकाता संघाला आगामी सामना जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे हैदराबाद संघाच्या पराभवानंतरही प्ले ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत.

धावफलक, नाणेफेक कोलकाता (फलंदाजी)
कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६
व्यंकटेश अय्यर त्रि.गो. जान्सेन ०७ ०६ ०१ ०
रहाणे झे. शशांक गो. उमरान २८ २४ ०० ३
नितिश झे.शशांक गो. उमरान २६ १६ ०१ ३
श्रेयस झे. राहुल गो. उमरान १५ ०९ ०२ ०
सॅम झे.विलियम्सन गो. भुवनेश्वर ३४ २९ ०३ १
रिंकु सिंग पायचीत गो. नटराजन ०५ ०६ ०० ०
आंद्रे रसेल नाबाद ४९ २८ ०३ ४
सुनील नरेन नाबाद ०१ ०२ ०० ०
अवांतर : १२ एकूण : २० षटकांत ६ बाद १७७ धावा. गडी बाद क्रम : १-१७, २-६५, ३-७२, ४-८३, ५-९४, ६-१५७
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२७-१, मार्को जाॅन्सेन ४-०-३०-१, टी.नटराजन ४-०-४३-१, वाशिंग्टन सुंदर ४-०-४०-०, उमरान मलिक ४-०-३३-३.
सनरायझर्स हैदराबाद धावा चेंडू ४ ६
अभिषेक झे.सॅम्स गो. वरुण ४३ २८ ०४ २
विलियम्सन त्रि.गो. रसेल ०९ १७ ०१ ०
राहुल त्रिपाठी त्रि.गो. साउथी ०९ १२ ०१ ०
अॅडेन मार्कराम त्रि.गो. उमेश ३२ २४ ०० ३
निकोलस पुरन झे.गो. नरेन ०२ ०३ ०० ०
वॉशिंग्टन झे. व्यंकटेश गो. रसेल ०४ ०९ ०० ०
शशांक झे.श्रेयस गो. साऊथी ११ १२ ०१ ०
मार्को जान्सेन झे.सॅम्स गो. रसेल ०१ ०२ ०० ०
भुवनेश्वर कुमार नाबाद ०६ ०७ ०१ ०
उमरान मलिक नाबाद ०३ ०५ ०० ०
अवांतर : ०३, एकूण : २० षटकांत ८ बाद १२३ धावा. गडी बाद क्रम : १-३०, २-५४, ३-७२, ४-७६, ५-९९, ६-१०७, ७-११३, ८-११३. गोलंदाजी : उमेश यादव ४-०-१९-१, टीम साऊथी ४-०-२३-२, सुनील नरेन ४-०-३४-१, आंद्रे रसेल ४-०-२२-३, वरुण चक्रवर्थी ४-०-२५-१.
सामनावीर : आंद्रे रसेल

श्रेयस १०० व्या सामन्यात फ्लॉप :
कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या कर्णधार श्रेयस अय्यरने(१५) शनिवारी आयपीएलमधील आपला १०० वा सामना खेळला. मात्र, तो शतकी सामन्यात फ्लॉप ठरला.

तीन, टीम साऊथीने दोन, उमेश यादव, सुनील नरेन व वरुणने प्रत्यकेी एक बळी घेतला. यासह कोलकाता संघाला लीगमध्ये विजयी षटकार मारता आला. दुसरीकडे हैदराबाद संघाला सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता रसेलने शानदार खेळीतून आपल्या कर्णधार श्रेयस अय्यरला शतकी सामन्यात विजय मिळवून दिला.

बातम्या आणखी आहेत...