आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Kuldeep Knocked Out Kolkata Riders Last Year, Giving Delhi Capitals A 44 run Victory; Kolkata Loses, Man Of The Match Kuldeep Takes Four Wickets

IPL 2022:कुलदीपने गतवर्षी संधी न देणाऱ्या कोलकाता रायडर्सचा उडवला धुव्वा, घेतले शानदार 4 बळी, दिल्ली कॅपिटल्स संघाचा 44 धावांनी विजय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर कुलदीप यादवने (४/३५) गत सत्रामध्ये एकाही सामन्यात संधी न देणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा यंदाच्या आयपीएलमध्ये फडसा पाडला. कुलदीपच्या सर्वाेत्तमगोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या सत्रातील आपल्या चाैथ्या सामन्यात गत उपविजेत्या कोलकाता संघाला धुळ चारली. दिल्ली संघाने १९.४ षटकांत ४४ धावांनी सामना जिकंला. यासह दिल्ली संघाने स्पर्धेत आपल्या नावे दुसऱ्या विजयाची नाेंद केली. ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली संघाने यंदा फाॅर्मात असलेल्या कोलकाता संघाची विजयी मोहिम रोखली. तीन विजयानंतर कोलकाता संघाचा पहिला पराभव झाला. तरीही संघ अव्वल स्थानी कायम आहे.

पृथ्वी शॉ (५१) आणि डेव्हिड मिलरच्या (६१) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता टीमसमोर २१६ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने १९.४ षटकांमध्ये अवघ्या १७१ धावांवर आपला गाशा गुंडाळला. संघाकडून कर्णधार श्रेयस अय्यरने (५४) एकमेव अर्धशतकी खेळी केली. इतर फलंदाज सामन्यात सपशेल अपयशी ठरले.

सुमार खेळीचा केकेआरला फटका
कोलकाता संघाला रविवारी दिल्ली टीमविरुद्ध सामन्यातील सुमारगोलंदाजी महागात पडली. त्यामुळे टीमला पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच स्पर्धेतील विजयी मोहिमेला ब्रेक लागला. याशिवाय फलंदाजांनाही समाधानकारक खेळी करता आली नाही. फलंदाजांचेही अपयश आता संघाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. कर्णधार अय्यर वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळेच संघाला झटपट आपला गाशा गुंडाळावा लागला. भरवशाचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे (८) स्वस्तात बाद झाला. तसेच नितीश राणा, व्यंकटेश अय्यर यांनीही संघाची निराशा केली.

धावफलक, नाणेफेक कोलकाता (गोलंदाजी)
दिल्ली कॅपिटल्स धावा चेंडू ४ ६
पृथ्वी शॉ त्रि.गो. वरुण चक्रवर्थी ५१ २९ ०७ २
डेव्हिड वॉर्नर झे.रहाणेगो.उमेश ६१ ४५ ०६ २
ऋषभ पंत झे.उमेशगो. रसेल २७ १४ ०२ २
ललीत यादव पायचीतगो. नरेन ०१ ०४ ०० ०
रोवमान पॉवेल झे. सिंगगो. नरेन ०८ ०६ ०० १
अक्षर पटेल नाबाद २२ १४ ०२ १
शार्दूल ठाकूर नाबाद २९ ११ ०१ ३
अवांतर : १६. एकूण : २० षटकांत ५ बाद २१५ धावा.
गडी बाद क्रम : १-९३, २-१४८, ३-१५१, ४-१६१, ५-१६६गोलंदाजी : उमेश यादव ४-०-४८-१, रसिख सलाम १-०-१०-०, पॅट कमिन्स ४-०-५१-०, वरुण चक्रवर्थी ४-०-४४-१, सुनील नरेन ४-०-२१-२, आंद्रे रसेल २-०-१६-१, व्यंकटेश अय्यर १-०-१४-०.
कोलकाता नाइट रायडर्स धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. शार्दूलगो. अहमद ०८ १४ ०१ ०
व्यंकटेश झे. पटेलगो. अहमद १८ ०८ ०१ २
श्रेयस यष्टी.ऋषभगो. कुलदीप ५४ ३३ ०५ २
नितिश राणा झे.पृथ्वीगो. ललित ३० २० ०० ३
आंद्रे रसेल झे.खानगो. शार्दूल २४ २१ ०३ ०
बिलिंग्स झे. ललीतगो. अहमद १५ ०९ ०१ १
पॅट कमिन्स पायचीतगो. कुलदीप ०४ ०३ ०१ ०
नरेन झे.पॉवेलगो. कुलदीप ०४ ०२ ०१ ०
उमेश यादव झे.गो. कुलदीप ०० ०१ ०० ०
सलाम झे.पॉवेलगो. शार्दूल ०७ ०६ ०१ ०
वरुण चक्रवर्थी नाबाद ०१ ०१ ०० ०
अवांतर : ०६. एकूण : १९.४ षटकांत सर्वबाद १७१ धावा. गडी बाद क्रम : १- २१, २-३८, ३-१०७, ४-११७, ५-१३३, ६-१३९, ७-१४३, ८-१४३, ९-१७०, १०-१७१गोलंदाजी : मुस्तफिजूर रहमान ४-०-२१-०, शार्दूल ठाकूर २.४-०-३०-२, खलील अहमद ४-०-२५-३, अक्षर पटेल ३-०-३२-०, कुलदीप यादव ४-०-३५-४, रोवमान पॉवेल १-०-१७-०, ललीत यादव १-०-८-१.