आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच प्रिव्ह्यू:गत चॅम्पियन चेन्नईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; पंजाब किंग्जविरुद्ध सामना आज सायंकाळी 7.30 वाजेपासून

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई : गोलंदाजांची संघाला उणीव भासते
संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या लढतीत फलंदाज अपयशी ठरले, दुसऱ्या सामन्यात दवाने गोलंदाजांच्या अडचणी वाढवल्या आणि संघ २००+ चे आव्हान वाचवू शकला नाही. नाणेफेक निकालात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दुसऱ्या डावात दव पडत असल्याने संघ पाठलाग करण्याचा निर्णय घेत आहेत. चेन्नईला गोलंदाजीत दीपक चाहर व अॅडम मिलेनची उणीव भासत आहे. स्लॉगमधील तज्ज्ञ ख्रिस जॉर्डन रुग्णालयात भरती आहे.

पंजाब किंग्ज : पॉवर हिटरकडून अपेक्षा
संघाकडे अनेक पॉवर हिटर आहेत, मात्र केकेआरविरुद्ध ते अपयशी ठरले. ६ गड्यांनी झालेल्या पराभवातून बाहेर पडत विजयी ट्रॅकवर येण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. त्यांना आपल्या फलंदाजांकडून अपेक्षा आहेत. मयंक अग्रवाल, शिखर धवन व भानुका राजपक्षे विरोधकांवर एकतर्फी हल्ला करू शकतात. ओडियम व शाहरूख चांगली खेळी करू शकतात. दोघांना फिनिशरची भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...