आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई सुपर किंग्जचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने शनिवारी ट्विट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. दुपारी 12:46 वाजता रायुडूने लिहिले की, ही त्याची शेवटची IPL आहे. हे ट्विट होताच एकच खळबळ उडाली होती, मात्र 15 मिनिटांतच रायुडूने ट्विट डिलीट केले. यानंतर CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनीही याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले रायुडू निवृत्त होत नाहीये.
रायडूच्या पोस्टमध्ये - धन्यवाद मुंबई आणि चेन्नई
'मला तुम्हाला कळवायला आनंद होत आहे की हा माझा IPL चा शेवटचा हंगाम असेल. मला आनंद आहे मागील 13 वर्षांपासून मी या लीगच्या दोन संघांमध्ये खेळलो आहे.. या सुखद प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानू इच्छितो.
I am happy to announce that this will be my last ipl. I have had a wonderful time playing it and being a part of 2 great teams for 13 years. Would love to sincerely thank Mumbai Indians and Csk for the wonderful journey.
— Ambati Rayudu (@RayuduAmbati) May 14, 2022
रायुडूला निवृत्तीचे ट्विट डिलीट करण्यासाठी केवळ 15 मिनिटे लागली, मात्र यादरम्यान सुमारे आठ हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
रायुडूचे खाते हॅक झाल्याचा संशय
2020 नंतर अंबाती रायुडूच्या ट्विटर अकाउंटवरून हे पहिले ट्विट होते. त्यामुळे रायुडूचे खाते हॅक होण्याची शक्यता आहे. याची 3 कारणे आहेत.
रायुडूने या IPL मध्ये केल्या आहेत 271 धावा
अंबाती रायुडूने चेन्नईसाठी 12 सामन्यात 124.31 च्या स्ट्राइक रेटने 271 धावा केल्या आहेत. रायुडूच्या एकूण कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने IPL च्या 187 सामन्यांमध्ये 127.26 च्या स्ट्राइक रेटने 4187 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. रायुडूने 349 चौकार आणि 164 षटकार मारले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.