आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2023:लियाम लिव्हिंगस्टोनची आयपीएलमध्ये परत येण्याची तारीख निश्चित नाही; मँचेस्टरमध्ये वास्तव्य, ECB कडून वैद्यकीय मंजुरी नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाब किंग्जने 2022 च्या आयपीएल लिलावात लिव्हिंगस्टोनला 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.   - Divya Marathi
पंजाब किंग्जने 2022 च्या आयपीएल लिलावात लिव्हिंगस्टोनला 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.  

पंजाब किंग्जचा खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन सध्या इंग्लंडमध्ये आहे. 5 एप्रिल रोजी पंजाबचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होता. या दरम्यान, सामन्यानंतर पंजाब किंग्जच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, लियाम लिव्हिंगस्टन पुढील संघात सामील होईल.

लिव्हिंगस्टोनच्या आगमनाची शक्यता दिसत नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब (LCCC) ने सांगितले की लियाम लिव्हिंगस्टोनला संघात सामील होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागेल.

पंजाबने 11.5 कोटी रुपयांना खरेदी केले

पंजाब किंग्जने 2022 च्या आयपीएल लिलावात या अष्टपैलू खेळाडूला 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले. लियाम लिव्हिंगस्टोन फंलंदाजी बरोबरच उजव्या हाताने ऑफ स्पिन करतो.

लिव्हिंगस्टोन अजून तंदुरुस्त नाही

ईसीबीच्या अधिकाऱ्याने क्रिकेट वेबसाइट क्रिकबझला सांगितले की, लिव्हिंगस्टोन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. लिव्हिंगस्टोन 15 एप्रिलच्या आसपास खेळण्याची अपेक्षा आहे. घोट्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे लिव्हिंगस्टोन डिसेंबरपासून क्रिकेट खेळलेला नाही.

सोशल मीडियावर टीमला चीअर

लिव्हिंगस्टोनने गुरुवारी स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, आयपीएल हंगामाची प्रतीक्षा आहे. मात्र, लिव्हिंगस्टोन सोशल मीडियावर पंजाब संघाला चीअर करत आहे.