आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग 2022 सीझनमध्ये मंगळवारी पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 16 षटकांत 8 गडी राखून पराभव करून, त्यांचा 5वा विजय नोंदवला. या सामन्यात पंजाब संघाच्या लियाम लिव्हिंगस्टोनने सीझनमधील सर्वात लांब 117 मीटर षटकार मारून दिग्गजांनाही चकित केले आहे. मात्र आश्चर्यचकित होऊ नका, कारण आयपीएलच्या इतिहासात यापेक्षा लांब षटकारही मारले गेले आहेत.
लियामने 10 चेंडूत 30 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 2 चौकारही लगावले. यादरम्यान लियामने डावाच्या 16व्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या चेंडूवर हा षटकार मारला होता. लिव्हिंगस्टोनने डावा पाय काढून चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला. चेंडूने 117 मीटरचे अंतर कापले आणि तो थेट स्टँडमध्ये पडला.
2022 च्या सीझनमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारे खेळाडू
सर्वाधिक लांब षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे
लियामने या षटकारासह आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब षटकार ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी 2016 च्या सीझनमध्ये बेन कटिंगने 117 मीटर लांब षटकार मारला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना कटिंगने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हा षटकार ठोकला होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. 2013 च्या सीझनमध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध 119 मीटर लांब षटकार ठोकला होता.
IPL इतिहासात सर्वात लांब षटकार लगावणारे प्लेयर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.