आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकेशच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपरजायटं्स संघाला यंदाच्या आयपीएलमधील प्लेऑफचा प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. यासाठी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या लखनऊ संघाचा सामना आज रविवारी तिसऱ्या स्थानावरील राजस्थान राॅयल्स टीमविरुद्ध होणार आहे. सत्रातील शेवटच्या डबल हेडरमधील दुसरा सामना लखनऊ आणि राजस्थान यांच्यात होणार आहे. प्लेऑफच्या आशा संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दुपारी गुजरात टीमच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मुंबईविरुद्ध गत सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाने चेन्नई टीमची प्लेऑफ प्रवेशाची संधी हुकली. लोकेशच्या नेतृत्वाखाली यंदा लखनऊ संघाची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे आता राजस्थानविरुद्ध सामन्यात बाजी मारून लखनऊ संघ प्लेऑफ प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज आहे. यासह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करणारा लखनऊ हा दुसरा संघ ठरणार आहे.
लखनऊ संघाने यंदा १२ सामन्यांत आठ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी धडक मारली. राजस्थानने १२ सामन्यांत ७ विजयांसह गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. यंदाच्या सत्रात दुसऱ्या सामन्यात हे दाेन्ही संघ समोरासमोर
राजस्थान : मोठ्या धावसंख्येने निश्चित होणार विजय
सॅमसनच्या राजस्थान राॅयल्स संघाला आता विजयासाठी लखनऊविरुद्ध सामन्यात मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. यासाठी फॉर्मात असलेल्या ऑरेज कॅप होल्डर जोस बटलरकडून मोठ्या खेळीची आशा आहे. तो गत तीन सामन्यांपासून मोठ्या खेळीत अपयशी ठरत आहे. मात्र, आता त्याला लखनऊविरुद्ध सामन्यात मोठ्या खेळीची संधी आहे. तसेच गोलंदाजीमध्ये पर्पल कॅप होल्डर युजवेंद्र चहलने दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवले आहे. त्यामुळे राजस्थान संघाची गोलंदाजीतील बाजू दमदार मानली जाते. लखनऊ संघाला आपल्या कर्णधार लोकेशकडून मोठ्या खेळीचा विश्वास आहे. त्याच्या नावे सत्रामध्ये ४५९ धावांची नाेंद आहे. लखनऊ संघाकडून गोलंदाजीत आवेश खानने सर्वाधिक १६ विकेट घेतल्या आहेत. त्याच्यावर नजर असेल.
गुजरातला अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
-प्लेऑफचा प्रवेश निश्चित करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला रविवारी विजयाची संधी आहे. याच विजयाने गुजरात संघाला गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवता येणार आहे. गुजरात संघ सध्या १८ गुणांसह अव्वलस्थानावर आहे. धाेनीचा चेन्नई संघ आठ गुणांसह नवव्या स्थानी आहे. गुजरात संघाला आता शुभमान गिल, डेव्हिड मिलर आणि हार्दिककडून मोठ्या खेळीची आशा आहे. हे तिघेही सध्या फॉर्मात आहेत. याशिवाय शमी, राशिद आणि लॉकी फर्ग्युसनने गोलंदाजीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या तिघांच्याही नावे प्रत्येकी १० बळींची नाेंद आहे. सत्रात ३००+ धावा करणारा ऋतुराज हा चेन्नई संघाकडून एकमेव फलंदाज ठरला आहे. तसेच धाेनीही सध्या चांगली कामगिरी करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.