आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुणवंत आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉसारखेच आता सुपरस्टार क्रिकेटपटूसाठी महाराष्ट्राच्या विकी ओस्तवालला घडवणार आहे. त्याच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. आता याच गुणवत्तेला खास मार्गदर्शनातून चालना देता येईल. याशिवाय संघामध्ये विश्वविजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या युवा कॅप्टन यश धूलही आहे. या दाेघांना कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी खास मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने दैनिक दिव्य मराठीशी बाेलताना दिली.
पुण्याच्या युवा गोलंदाज विकी ओस्तवालला आता ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळत आहे. त्याची आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकातील कामगिरी कौतुकास्पद ठरली. आता त्याची नजर आयपीएल गाजवणार लागली आहे. यासाठी आता ताे सलामी सामन्यातील संधीसाठी उत्सुक आहे.ऋषभकडूनही त्याला शिबिरामध्ये खास टिप्स मिळाल्या आहेत. याचा नक्कीच सामन्यादरम्यान मला मोठा फायदा होईल, असेही त्याने सांगितले.
विकीमध्ये प्रचंड गुणवत्ता : पुण्याच्या विकी ओस्तवालमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्याची विश्वचषकातील कामगिरी ही लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे आता मी त्याच्यावर खास मेहनत घेणार आहे. त्याच्यातील काही उणीवा भरून काढायच्या आहेत. त्यामुळे त्याला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावता येईल. यातून सर्वाेत्तम असा खेळाडू घडवला जाणार आहे.
रोहितसारखाच यशस्वी कर्णधार हाेणार ऋषभ पंत : रोहित सध्या यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्यासारखीच प्रचंड गुणवत्ता आणि क्षमता ही यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतमध्ये आहे. त्यामुळे ऋषभ हा भविष्यात रोहितसारखाच यशस्वी कर्णधार ठरू शकतो. त्याच्यात कुशल असे नेतृत्वगुण आहेत. त्याने अल्पवाधीमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली. यंदा ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीला सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे. त्याच्यात प्रचंड गुणवत्ता आहे. त्याने सातत्याने सिद्ध केले. आता त्याला कुशल नेतृत्वामध्येही बाजी मारावी लागणार आहे.
दिल्ली संघात गुणवंत युवांची फौज : दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये गुणवंत अशा युवा खेळाडूंची फौज आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा टीमला यंदाच्या सत्रात होऊ शकेल. संघाचे नेतृत्वही युवा आहे. त्यामुळे मनदीप, नागरकोटी, कुलदीप आणि सरफराजमध्ये मोठ्या खेळीची प्रचंड क्षमता आहे. या युवा खेळाडूंमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. हे आता स्पर्धेदरम्यान सिद्ध होणार आहे. कमलेश नागरकोटी आणि कुलदीपला मोठा अनुभव आहे.
पॉवेलची खेळी ठरेल लक्षवेधी : सामन्यादरम्यान आता मधल्या फळीमध्ये संघाला मोठ्या खेळीसाठी पॉवेलचा झंझावात फायदेशीर ठरेल. त्याच्याकडून टीमला चौथ्या व पाचव्या स्थानावरून मोठ्या खेळीची आशा आहे. यासाठी आम्ही त्याच्याकडून प्रचंड सराव करून घेतला आहे. आता तो या स्थानावरून निश्चितपणे झंझावाती खेळी करू शकणार आहे. त्यामुळे टीमची फलंदाजांची फळीही मजबुत झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.