आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI Vs CSK सामन्याचे मोमेंट्स:रोहित शर्मा 16व्यांदा शून्यावर बाद, साऊथचा सुपरस्टार धनुष नव्या लूकमध्ये सामना पाहण्यासाठी पोहोचला

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामातील 49 वा सामना शनिवारी सीएसकेच्या होम चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला, जो महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 6 गडी राखून जिंकला.

असे काही क्षण या सामन्यात पाहायला मिळाले, जे पाहून CSK चे चाहते टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. असे काही क्षणही आले, जे पाहून एमआयच्या चाहत्यांनी डोक्याला हात लावला.

साऊथ सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री नयनतारा यांनी या सामन्याला हजेरी लावून चाहत्यांना दिला सुखद धक्का. धनुष नव्या रुपात सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला होता.

महेंद्रसिंहा धोनीची मुलगी जीवा सामन्यादरम्यान वडिलांना चिअर करताना दिसली.

या बातमीत जाणून घ्या, सामन्यातील अशाच काही क्षणांबद्दल...

चला, धोनीची मुलगी जीवा आणि पत्नी साक्षी धोनीच्या या फोटोपासून सुरुवात करूया...

1. साक्षी आणि तिची मुलगी मॅच पाहण्यासाठी पोहोचल्या
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा सामना पाहण्यासाठी चेपॉक स्टेडियमवर पोहोचल्या. मॅचदरम्यान साक्षीसोबत तिचे मित्र-मैत्रीणही स्टँडवर बसून मॅच बघताना दिसले. धोनी फलंदाजीला उतरला तेव्हा मुलगी जीवा त्याला चिअर करताना दिसली.

मुलगी जीवासोबत स्टेडियममध्ये प्रवेश करताना साक्षी धोनी.
मुलगी जीवासोबत स्टेडियममध्ये प्रवेश करताना साक्षी धोनी.
जीवा वडील धोनीला चिअर करताना दिसली. जीवाच्या हातात सीएसकेचा झेंडा होता.
जीवा वडील धोनीला चिअर करताना दिसली. जीवाच्या हातात सीएसकेचा झेंडा होता.

2. धनुष मॅच पाहण्यासाठी पोहोचला, नव्या लूकमध्ये दिसला
दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार अभिनेता धनुषही सामना पाहण्यासाठी आला होता. तो पूर्णपणे नवीन लूकमध्ये दिसला. धनुषशिवाय अभिनेत्री नयनताराही पोहोचली. नयनतारा शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

धनुष (डावीकडे) त्याच्या मित्रांसह सामना पाहण्यासाठी येतो. धनुष त्याचा आगामी चित्रपट 'कॅप्टन मिलर'चे शूटिंग करत आहे. त्यामुळे तो रोलच्या लूकमध्ये दिसला.
धनुष (डावीकडे) त्याच्या मित्रांसह सामना पाहण्यासाठी येतो. धनुष त्याचा आगामी चित्रपट 'कॅप्टन मिलर'चे शूटिंग करत आहे. त्यामुळे तो रोलच्या लूकमध्ये दिसला.
साऊथ अभिनेत्री नयनताराही मॅच पाहण्यासाठी पोहोचली.
साऊथ अभिनेत्री नयनताराही मॅच पाहण्यासाठी पोहोचली.

3. रोहित शर्मा 16व्यांदा शून्यावर बाद
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 16व्यांदा शून्यावर आऊट झाला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तो फलंदाज ठरला. त्याने सुनील नरेनचा विक्रम मोडला. सहसा रोहित सलामीला उतरतो, पण शनिवारी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

ईशान किशनसोबत कॅमेरून ग्रीन सलामीला आला, पण दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. तिसर्‍याच षटकात ईशानही बाद झाला. रोहित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, पण तोही तिसऱ्याच षटकातील पाचव्या चेंडूवर दीपक चहरचा बळी पडला. रोहित आऊट होताच मुंबईच्या चाहत्यांनी डोक्याला हात लावला.

या मोसमात रोहित सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी त्याला पंजाबविरुद्ध खातेही उघडता आले नव्हते.
या मोसमात रोहित सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी त्याला पंजाबविरुद्ध खातेही उघडता आले नव्हते.

तुषार देशपांडेला मिळाली पर्पल कॅप
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याला पर्पल कॅप मिळाली. शनिवारी मुंबईविरुद्ध तुषारने 4 षटकात 26 धावा देऊन 2 बळी घेतले. यासह तो मोहम्मद शमीला मागे टाकत 19 विकेट्ससह चालू मोसमातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. शमीच्या नावावर 10 सामन्यात 18 विकेट आहेत. पहिल्या डावानंतर तुषारला पर्पल कॅप देण्यात आली.

तुषार देशपांडेला पर्पल कॅप प्रदान करण्यात आली.
तुषार देशपांडेला पर्पल कॅप प्रदान करण्यात आली.

आता पाहा सामन्याशी संबंधित फोटो...

चेन्नई सुपर किंग्जचा चाहतावर्ग त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आला होता.
चेन्नई सुपर किंग्जचा चाहतावर्ग त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आला होता.
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी मुलगा आकाशसोबत सामना पाहण्यासाठी पोहोचल्या.
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी मुलगा आकाशसोबत सामना पाहण्यासाठी पोहोचल्या.
चेन्नईच्या मथिश पथिरानाने तीन बळी घेतले.
चेन्नईच्या मथिश पथिरानाने तीन बळी घेतले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (पिवळ्या जर्सीत) देखील सामना पाहण्यासाठी आले होते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (पिवळ्या जर्सीत) देखील सामना पाहण्यासाठी आले होते.