आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • MI Vs DC 13th IPL Match LIVE Score; Rishabh Pant Rohit Sharma | Chennai Stadium News | Mumbai Indians Vs Delhi Capitals IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

DC vs MI:दिल्लीचा मुंबईवर सहा गडी राखून विजय, दोन विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL च्या 14 व्या मोसमातील 13वा सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियंस (MI) आणि दिल्ली कपिटल्स (DC)दरम्यान चेन्नईमध्ये झाला. यात दिल्लीने मुंबईवर सहा गडी राखून विजय मिळवला. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दिल्लीच्या संघाने 4 विकेट गमावून 138 धावा काढत सामना आपल्या खिशात घातला. धवनने सर्वाधिक 45 आणि स्किव्ह स्मिथने 33 रनांची खेळे केली. यानंतर ललित यादव(22), पृथ्वी शॉ(7), ऋषभ पंत7) आणि शिमरन हेटमायरने 14 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरन पोलार्ड आणि राहुल चाहरने प्रत्येक एक विकेट घेतली.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 138 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर, चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर अमित मिश्राने 4 विकेट घेतल्या. मिश्राने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड आणि ईशान किशनला माघारी पाठवले.

मुंबई इंडियंसने 9 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 137 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 30 चेंडूनत सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. त्यात त्याने 3 चौके आणि 3 षटकार लगावले. रोहितनंतर ईशान किशनने 26 आणि सुर्यकुमार यादवने 24 रन केले. दिल्लीसाठी अमितशिवाय मार्कस स्टोइनिस, आवेश खान, कगिसो रबाडा आणि ललित यादवने 1-1 विकेट घेतल्या.

दोन्ही संघातील परदेशी खेळाडू
मुंबईच्या प्लेइंग-11 मध्ये क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट सामील आहे. तर, दिल्लीमध्ये स्टीव स्मिथ, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर आणि कगिसो रबाडा आहेत.

दोन्ही संघ

दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, कगिसो रबाडा, अमित मिश्रा आणि आवेश खान.

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला

मागच्या सीजनमध्ये दोन्ही संघांमध्ये 4 सामने झाले होते. त्या सर्वसामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता. दोन्ही संघात मागच्या वर्षीचा अंतिम सामना झाला होता, त्यातही मुंबईने पाच गडी राखून दिल्लीचा धुवा उडवला होता. मागच्या सीजनमध्ये दिल्ली पहिल्यांदा अंतिम फेरीत आली होती. त्यामुळे आजचा सामना जिंकून दिल्लीने त्या सर्व पराभवाचा वचवा काढला आहे.

बातम्या आणखी आहेत...