आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI चा सीझनमधील पहिला विजय:सूर्यकुमारचे अर्धशतक, मुंबई विजयी; काेलकात्याचा 10 धावांनी पराभव

चेन्नई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने मंगळवारी आयपीएलच्या १४ व्या सत्रामध्ये विजयाचे खाते उघडले. सलामीच्या पराभवातून सावरलेल्या मुंबई संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात इयान माॅर्गनच्या काेलकाता नाइट रायडर्सला पराभूत केले. राेहितच्या मुंबई संघाने १० धावांनी सामना जिंकला. राहुल चहरच्या (४/२७) शानदार गाेेलंदाजीने पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीच्या आधारे मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना काेलकाता टीमसमाेर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात काेलकाता संघाला सात गड्यांच्या माेबदल्यात १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. टीमच्या विजयासाठी नितीश राणाने (५३) दिलेली एकाकी झंुज व्यर्थ ठरली. इतर फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. टीमकडून शुभमान गिलने ३३ धावांची खेळी केली. मुंबई संघाकडून राहुल चहरने चार, ट्रेंट बाेल्टने दाेन आणि कृणाल पांड्याने एक विकेट घेतली.

आंद्रे रसेलची खेळी व्यर्थ : काेलकाता संघाकडून आंद्रे रसेलने शानदार पाच विकेट घेतल्या. मात्र, पराभवामुळे आता त्याची सर्वाेत्तम खेळी व्यर्थ ठरली. त्याने दाेन षटकांत १५ धावा देताना पाच बळी घेण्याचा पराक्रम गाजवला.

बातम्या आणखी आहेत...