आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलामीवीर व्यंकटेश अय्यर (५३) अाणि राहुल त्रिपाठीच्या (७४) अर्धशतकी भागीदारीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्स संघाने गुरुवारी अायपीएलमध्ये चाैथा विजय संपादन केला. काेलकाता संघाने लीगमधील अापल्या नवव्या सामन्यात राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघावर ७ विकेटने मात केली. यासह काेलकाता संघाला नऊ सामन्यांत चाैथा विजय साकारता अाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला पाचव्या पराभवाला सामाेरे जावे लागले. राेहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना इयान माॅर्गनच्या काेलकाता टीमसमाेर विजयासाठी १५६ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने १५.१ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. सलामीवीर शुभमान गिल (१३), व्यंकटेश अय्यर (५३) अाणि राहुल त्रिपाठीने नाबाद अर्धशतकातून संघाला विजय मिळवून दिला. संघाच्या विजयात कर्णधार माॅर्गनने ७ धावांची खेळी केली. सलग दुसऱ्या विजयासह काेलकाता संघाने गुणतालिकेत चाैथ्या स्थानी धडक मारली.
व्यंकटेशचे २५ चेंडूंत पहिले अर्धशतक
काेलकाता संघाच्या युवा सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यरने कर्णधार माॅॅर्गनने दिलेल्या संधीला सार्थकी लावताना शानदार २५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सत्रात पहिल्या अर्धशतकाची नाेंद अापल्या नावे केली. त्याने ३० चेंडूंचा सामना करताना चार चाैकार अाणि तीन उत्तंुग षटकारांतून ५३ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने सलामीच्या शुभमानसाेबत पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्यानंतर अापली लय कायम ठेवताना राहुल त्रिपाठीसाेबत दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचली. यासह त्याने टीमच्या विजयाचा मजबूत पाया रचला.
राेहितचा विक्रम - एकाच टीमविरुद्ध एक हजार व लीगमध्ये ५५०० धावा
मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार राेहित शर्माने ३० चेंडूंत ३३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने विक्रमी धावांचा पल्ला गाठला. त्याने अायपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक एक हजार धावा पुर्ण करण्याचा पराक्रम गाजवला. त्याच्या अाता काेलकात्याविरुद्ध एक हजार धावा पूर्ण झाल्या अाहेत. याशिवाय त्याने अायपीएलमध्ये अापल्या ५५०० धावा पूर्ण केल्या अाहेत. सर्वाधिक धावांत त्याने तिसऱ्या स्थानी धडक मारली. यादरम्यान त्याने सुरेश रैनाला (५४९५) सर्वाधिक धावांच्या कामगिरीत मागे टाकले अाहे.
अय्यरची स्फोटक खेळी
केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याने आपल्या डावात चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. अय्यरने आपले पहिले आयपीएल अर्धशतक केवळ 25 चेंडूत पूर्ण केले होते. अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली.
गिल-अय्यरची वादळी सुरुवात
शुभमन गिल (13) म्हणून केकेआरची पहिली विकेट पडली, त्याची विकेट जसप्रीत बुमराहच्या खात्यात आली आणि त्याने धीम्या चेंडूवर गिलला बोल्ड केले. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने बाद होण्यापूर्वी फक्त 3 षटकांत 40 धावा जोडल्या.
मोठा स्कोअर करु शकली असती MI
रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. या जोडीला बघून असे वाटले की मुंबई सहजपणे 200+ स्कोअर करू शकेल, पण संपूर्ण टीम फक्त 155/6 चा स्कोअर सांभाळू शकली. पहिल्या विकेटनंतर संघाने शेवटच्या पाच विकेट 77 धावांत गमावल्या.
रोहितला सुनील नरेनने 30 चेंडूत 33 धावा केल्यावर बाद केले. आयपीएलमध्ये ही 7 वी आणि टी -20 फॉरमॅटमध्ये 9 वी वेळ होती जेव्हा रोहितची विकेट नरेनच्या खात्यात पडली. हिटमॅनच्या विकेटनंतर कृष्णाने सूर्यकुमार यादव (5) आणि 16 वे अर्धशतक पूर्ण केलेल्या क्विंटन डीकॉक (55) यांच्या विकेट्स घेतल्या. इशान किशन (14) देखील फार काही करू शकला नाही आणि त्याने आपली विकेट लॉकी फर्ग्युसनला दिली. पोलार्डने (21) धावांची खेळी खेळली, पण तोही शेवटपर्यंत संघाला साथ देऊ शकला नाही. केकेआरसाठी कृष्णा आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
रोहितने इतिहास घडवला
सामन्यातील पहिल्या 18 धावांसह रोहित शर्माने केकेआरविरुद्ध आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध 1000 धावा करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
सामन्यात रोहितने 30 चेंडूंत (33) धावा केल्या आणि सुनील नरेनने त्याला बाद केले. आयपीएलमध्ये ही 7 वी वेळ आहे जेव्हा रोहितची विकेट नरेनच्या खात्यात आली आहे.
हार्दिक पुन्हा बेंचवर
पुन्हा एकदा सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. याआधी त्याला CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर ठेवण्यात आले होते. हार्दिक सध्या पूर्णपणे फिट नसल्याने त्याला फेज 2 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
रोहितला इतिहास घडवण्याची संधी
केकेआरविरुद्ध 18 धावा केल्यावर रोहित शर्मा आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध 1000 धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. त्याने केकेआरविरुद्ध आतापर्यंत 982 धावा केल्या आहेत. या संघाविरुद्ध त्याची सरासरी 46.76 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 133.06 आहे.
दोन्ही संघ
MI - रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन (wk), किरॉन पोलार्ड, सौरभ तिवारी, कुणाल पंड्या, अॅडम मिल्ने, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
KKR - शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कॅप्टन), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (wk), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रणव कृष्ण.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.