आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • MI Vs PBKS 17th IPL Match LIVE Score; Rohit Sharma KL Rahul Hardik Pandya Jasprit Bumrah | Chennai Stadium News | Mumbai Indians Vs Punjab Kings IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MI vs PUNJAB:लोकेश-गेलच्या खेळीने पंजाब विजयी; मुंबई इंडियन्सने गमावला तिसरा सामना

चेन्नई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयपीएल पंजाब किंग्ज संघाने लीगमध्ये नोंदवला दुसरा विजय
  • लोकेशचे अर्धशतक; पंजाब 17.4 षटकांत 9 गड्यांनी विजयी

कर्णधार लाेकेश राहुल (६०) अाणि ख्रिस गेलने (४३) अर्धशतकी भागीदारीतून पंजाब किंग्जला अायपीएलमध्ये शानदार दुसरा विजय मिळवून दिला. या दाेघांच्या फटकेबाजीच्या बळावर पंजाब संघाने लीगमधील अापल्या पाचव्या सामन्यात गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सवर ९ गड्यांनी मात केली. यासह मुंबईने तिसरा सामना गमावला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ६ बाद १३१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पंंजाबने १७.४ षटकांत एका गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयासाठी लाेकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली. याशिवाय गेलने अाता नाबाद ४३ धावांची खेळी केली. त्यामुळे टीमने सामना जिंकला.

नाणेफेक जिंकून पंजाब किंग्ज संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. टीमचा सलामीवीर क्विंटन डिकाॅक (३) स्वस्तात बाद झाला. त्याला दीपक हुडाने बाद केेले. त्यापाठाेपाठ ईशान किशनही (६) बाद झाला. राेहितला साथ देण्यासाठी सूर्यकुमार यादवने कंबर कसली. त्याने राेहितसाेबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

पहिल्याच सामन्यात रवीचे दाेन बळी

पंजाबने युवा गाेलंदाज रवी बिश्नाेईला शुक्रवारी मुंबईविरुद्ध खेळण्याची संधी दिली. याच संधीला सार्थकी लावताना त्याने शानदार दाेन बळी घेतले. त्याने चार षटकांत २१ धावा देत हे यश संपादन केले. त्याने ईशान किशन (६) व सूर्यकुमारला (३३) बाद केले.

राेहितचे ४० वे अर्धशतक; तिसरा भारतीय फलंदाज
पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार राेहित शर्माने शुक्रवारी पंजाब किंग्जविरुद्ध तुफानी खेळी केली. त्याने ५२ चेंडूंमध्ये धडाकेबाज ६३ धावा काढल्या. यामध्ये त्याने पाच चाैकार अाणि दाेन षटकार खेचले. यासह त्याने अापल्या अायपीएल करिअरमधील ४० वे अर्धशतक साजरे केले. अायपीएलमध्ये ४० वा त्यापेक्षा अधिक अर्धशतकी खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अाता राेहित शर्मा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी अशी खेळी बंगळुरू टीमचा कर्णधार विराट काेहली (४०) व शिखर धवनच्या (४३) नावे नाेंद अाहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर हा ४९ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर विराजमान अाहे.

राजस्थान-काेलकाता अाज मुंबईमध्ये झंुजणार
राजस्थान राॅयल्स अाणि काेलकाता नाइट रायडर्स संघ नेतृत्वातील अपयशाने यंदाच्या अायपीएलमध्ये अडचणीत सापडले अाहेत. मात्र, अाता सरस खेळीच्या बळावर लीगमध्ये विजयी ट्रॅकवर येण्याचा या दोन्ही संघांचा मानस अाहे. यासाठी राजस्थान अाणि कोलकाता संघ अाज शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समाेरासमाेर असतील. अातापर्यंत या दाेन्ही संघांनी प्रत्येकी चार सामन्यांत प्रत्येकी एक विजय संपादन केला अाहे. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करून दुसरा विजय संपादन करण्यावर या दोन्ही संघांची नजर अाहे. संजू सॅमसनने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात झंझावाती शतकी खेळी केली.

दोन्ही संघ

पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरूख खान, फैबियन एलेन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट और जसप्रीत बुमराह.

बातम्या आणखी आहेत...