आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग (IPL) चे 14वे सत्र आजपासून सुरू होत आहे. या सत्राचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियंस (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) दरम्यान चेन्नईत झाला. या सामन्यात बंगळुरुने मुंबईवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई टीमने बंगलुरुला 160 धावांचे आव्हान दिले होते. बंगळुरुने 20 षटकात हे आव्हान काठले. बंगळुरूकडून एबी डिविलीयर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या.
सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
बंगळुरुची संथ सुरुवात
बंगळुरुला 36 धावांवर पहिला झटका लागला. ओपनर स्पिन ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर 16 बॉलमध्ये 10 रन काढून क्रुणाल पंड्याच्या बॉलवर आउट झाला. 46 धावांवर दुसरी विकेट पडली. डेब्यू मॅच खेळणारा रजत पाटीदार 8 रनांवर ट्रेंट बोल्टच्या बॉलवर आउट झाला. बंगळुरुकडून एबी डिविलीयर्सने सर्वाधिक 48 धावा केल्या.
मुंबई इंडियंसने 9 विकेट गमावून 159 धावा केल्या. मुंबईसाठी डेब्यू करणाऱ्या ओपनर क्रिस लिनने 35 बॉलमध्ये सर्वाधिक 49 धावा केल्या. तर, सुर्यकुमार यादवने 31 आणि इशान किशनने 28 रन काढले. RCB कडून हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
क्रिस लिन आणि सुर्यकुमारच्या पार्टनरशिपने मुंबईला सावरले
प्रथम फलंदाजी करताना मुंबईची खराब सुरुवात झाली. चौथ्या ओव्हरमध्ये 24 धावांवर कर्णधार रोहित शर्मा आउट झाला. यानंतर क्रिस लिन आणि सुर्यकुमारने दुसऱ्या विकेटसाठी 43 बॉलमध्ये 70 धावांची पार्टनरशिप करत संघाला सावरले. यानंतर 94 च्या स्कोअरवर सुर्यकुमार आउट झाला. 145 धावांपर्यंत आल्यावर मुंबईचा अर्धा संघ पवेलियनमध्ये परतला होता. मुंबईने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा केल्या.
दोन्ही संघ
मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, क्रिस लिन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड, मार्को जेंसन, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, एबी डिविलियर्स, ग्लेन मैक्सवेल, वॉशिंगटन सुंदर, डेनियल क्रिश्चियन, काइल जेमिसन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.