आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MI vs SRH सामना:राे‘हिट’चा विक्रम, मुंबई विजयी; हैदराबादची पराभवाची हॅट‌्ट्रिक

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबाद संघाचा 13 धावांनी पराभव; मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर

युवा गाेलंदाज राहुल चहरच्या (३/१९) व ट्रेंट बाेल्टच्या (३/२८) खेळीच्या बळावर गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सने शनिवारी आयपीएलमध्ये दुसरा विजय संपादन केला. मुंबईने १९.४ षटकांत डेव्हिड वाॅर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला १३ धावांनी पराभूत केले. मुंबईने दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. कर्णधार राेहित शर्माने (१३) सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये सर्वाधिक २१७ षटकार खेचणारा राेहित हा पहिला भारतीय फलंंदाज ठरला. त्याने धाेनीला (२१६) यात मागे टाकले.

हैदराबादची पराभवाची हॅट््ट्रिक झाली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५० धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद चा १३७ धावांत खुर्दा उडाला. संघाकडून कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (३६), बेअरस्टाे (४३) आणि शंकरने (२८) दिलेली झंुज व्यर्थ ठरली.

नाणेफेक जिंकून गतचॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कर्णधार राेहितचा हा निर्णय सलामीवीर क्विंटन डिकाॅकने याेग्य ठरवला. त्याने दमदार सुरुवात करताना कर्णधार आणि सलामीवीर राेहितसाेबत संघाला अर्धशतकी भागीदारी केली. या दाेघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची मजबूत भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, २५ चेंडूंमध्ये प्रत्येकी दाेन चाैकार आणि षटकारांसह ३२ धावांची खेळी करणारा कर्णधार राेहित शर्मा बाद झाला. त्याला युवा गाेलंदाज व्ही. शंकरने आपल्या टीमच्या विराट सिंगकरवी झेलबाद केले. त्यानंतर टीमच्या मधल्या फळीतल्या फलंदाज अपयशी ठरले. तिसऱ्या स्थानावर आलेला युवा फलंदाज सूर्यकुमार १० व ईशान किशन १२ धावांची खेळी केली. डिकाॅकने ३९ चेंडूंत पाच चाैकारांसह ४० धावांची खेळी केली. पाेलार्डने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्याने २२ चेंडूंत एका चाैकारासह तीन षटकार खेचले. हैदराबादकडून रहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...