आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Mitchell Marsh Leaves The Field Without Being Out While Playing Against Lucknow; Fans Call Mitchell A Villain, Watch The Video

प्रामाणिकपणा की मूर्खपणा?:लखनऊविरुद्ध आऊट न होता मिशेल मार्शने सोडले मैदान; चाहत्यांनी म्हटले सामन्याचा व्हिलन

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात की काहीही झाले तरी बॉलचा बॅटला स्पर्श झाला की नाही हे बॅट्समनला कळायला हवं. पण दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात असे काही घडले, ज्यामध्ये फलंदाजाने आऊट न होता मैदान सोडले. हे पाहून चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की मार्शने जे केले यावर काय बोलावे? या कृत्यामुळे मिशेल मार्शला सामन्याचा खलनायक म्हटले जात आहे.

गौतमला मिळाली फ्री विकेट
आवेश खानच्या जागी खेळताना के.गौतमने मिशेल मार्शची विकेट आपल्या नावावर केली. मात्र, मार्श नाबाद होता. वास्तविक मिशेलला गौतमच्या चेंडूवर चांगला शॉट मारायचा होता. पण चेंडू बॅटला लागला नाही आणि विकेटकीपर डी कॉकच्या हातामध्ये गेला.

डी कॉकला वाटले की बॅटला चेंडूचा स्पर्श झाला आहे आणि त्याने जोरदार अपील केली. चेंडूचा बॅटला स्पर्श झाला असल्याची मिशेललाही खात्री पटली. त्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने गेला. मार्श आऊट झाला यावर खुद्द गौतमचा विश्वास बसत नव्हता.

रिप्लेने केले दूध का दूध आणि पानी का पानीचेंडूचा बॅटला स्पर्श न झाल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले. मार्शच्या बॅटमधून 20 चेंडूत 37 धावा झाल्या. त्याने पंतसोबत केवळ 25 चेंडूत 60 धावा जोडल्या. ज्या वेळी त्याने रिव्ह्यू न घेता विकेट फेकली, त्या वेळी दिल्ली विजयाकडे वाटचाल करत होती.

मार्श बाद झाल्यानंतर ललित यादवही लवकर बाद झाला. रवी विश्नोईने त्याला क्लीन बोल्ड केले. मधल्या खेळात झटपट धावा काढण्यासाठी प्रसिद्ध ललितला लखनऊ विरुद्ध केवळ 3 धावा करता आल्या. यानंतर दिल्लीचा संघ सामन्यातून बाहेर पडला.

196 धावांच्या लक्ष्यासमोर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामीची जोडी फ्लॉप झाली. दिल्लीने 13 धावांत 2 विकेट गमावल्या. पृथ्वी शॉ 5 धावांवर बाद झाला, तर डेव्हिड वॉर्नर 3 धावा करून मोहसीन खानचा बळी ठरला. अशा स्थितीत कर्णधार ऋषभ पंत आणि मार्शने काउंटर अॅटॅकला सुरुवात केली. दोघांची धडाकेबाज फलंदाजी पाहून सामना 20 षटकांच्या आधीच संपेल असे वाटत होते.

अशा वेळेस 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांवर खेळत असलेल्या मार्शने चेंडूचा बॅटला स्पर्श झाला नसतांना स्वत: या खेळातून बाद झाला. आणि रिव्ह्यू न घेताच मैदान सोडले. त्यानंतर ऋषभ पंत एकटा पडला. याचा परिणाम असा झाला की वाढत्या धावगतीच्या दबावाखाली पंतने प्रत्येक चेंडूवर शॉट मारणे सुरु ठेवले.

अखेर 30 चेंडूत 44 धावा केल्यानंतर ऋषभ मोहसीन खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. कांगारू फलंदाज मिचेल मार्शने चूक केली नसती तर दिल्लीला सामना जिंकण्याची संधी मिळाली असती.

बातम्या आणखी आहेत...