आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL वर भास्कर पोल:39% फॅन्स रोहित आणि 31% राहुलला चांगले ओपनर मानतात, कोहली तिसऱ्या स्थानावर तर वॉर्नरला सर्वात कमी अंक

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मधील प्रयेक टीमकडे तडाखेबाज फलंदाजी करणारे ओपनर फलंदाज आहेत. ओपनिंग फलंदाजीच टीमचे टार्गेट देणे किंवा चेस करण्याचा पाया आहे. यामुळे कोणता ओपनर या सीझनमध्ये टीमला चांगली सुरुवात करून देईल? यासाठी भास्करने सोशल मीडियावर एक सर्व्हे केला.

यामध्ये सर्वात जास्त 38.8% वोट मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मिळाले आहेत. दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल आहे. त्याला 30.8% वोट मिळाले आहेत. 18.9% वोट मिळवून रॉयल चॅलेंजेसर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. चौथ्या स्थानावर 11.4% वोट मिळवून हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे.

लीगमध्ये सर्वात जास्त धावा कोहलीच्या नावावर
IPL इतिहासात सर्वात जास्त धावा बनवण्याच्या बाबतीत कोहली टॉपवर आहे. कोहलीने 193 सामन्यात 5911 धावा काढल्या आहेत. त्यानंतर सुरेश रैना (5422), रोहित शर्मा (5292), शिखर धवन (5282) आणि डेव्हिड वॉर्नर (5257) चा नंबर लागतो.

मागील सीझनमध्ये लोकेश राहुलला मिळाली होती ऑरेंज कॅप
मागील सीझनमध्ये पंजाबची टीम प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही परंतु राहुलचे प्रदर्शन चांगले राहिले होते. राहुलने सीझनमध्ये सर्वात जास्त 670 धावा काढल्या. राहुल व्यतिरिक्त वॉर्नरने 500 धावा काढल्या होत्या. कोहलीनेही मागील सीझनमध्ये 450 धावा काढल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...