आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने फलंदाजी करताना 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. धोनीने त्याच्या डावात 3 षटकार आणि 1 चौकार मारले. धोनीला शेवटच्या चेंडूवर षटकार मारता आला नसला तरी त्याने चाहत्यांची मने नक्कीच जिंकली. या सामन्यात सीएसकेला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी दिली. मीडियाशी बोलताना प्रशिक्षकांनी धोनीच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. त्यामुळे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, 'धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. जे तुम्हाला त्याच्याकडे पाहूनही जाणवू शकते. त्याचा फिटनेस नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. त्याच्या दुखापतीवर संघाकडून लक्ष ठेवले जात आहे. तो महान खेळाडू आहे, त्याच्यावर आम्हाला शंका नाही. मात्र धोनीच्या दुखापतीमुळे तो पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत प्रशिक्षकाने काहीही सांगितले नाही. पण आता हे सर्व चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहे.
अनेक खेळाडू दुखापतग्रस्त
CSK कॅम्पमध्ये अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. अनेक खेळाडू दुखापतीमुळे बेंचवर बसले आहेत, तर काही खेळाडू आयपीएलमधूनच बाहेर झाले आहेत. धोनीशिवाय दीपक चहर, सिमरजीत, बेन स्टोक्स आणि सिसांडा मगाला हे देखील दुखापतग्रस्त आहेत. त्याच वेळी, जॅमिसन आणि मुकेश चौधरी देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडले आहेत. दीपक चहर 2 आठवड्यांसाठी संघाबाहेर आहे, तर सिसांडा मगाला देखील किमान 1 आठवडा क्रिकेट खेळू शकणार नाही. याशिवाय बेन स्टोक्सही तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.