आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) आतापर्यंत 2 सामने खेळलेत. त्यापैकी एका सामन्यात सीएसकेचा विजय, तर दुसऱ्या पराभव झाला आहे. आता सीएसकेचा पुढील सामना 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे.
दुसरीकडे, सीएसकेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी सीएसकेच्या ड्रेसिंग रूममध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आशीर्वाद देताना दिसून येत आहेत. यावेळी धोनी आपला सहकाही मुरली विजयचीही भेट घेताना दिसून येत आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे.
गुजरात टायटन्सने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात सीएसकेचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सीएसकेने लखनऊ सुपरजायंट्सचा 12 धावांनी पराभव केला. आता त्यांचा पुढील सामना मुंबईविरोधात वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नई मुंबईला पराभूत करू शकते किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स विरोधातील सामन्यात माहीने अवघे 3 चेंडू खेळून 12 धावा केल्या. त्यात त्यांनी मार्क वूडला ठोकलेल्या सलग 2 षटकारांचा समावेश आहे. या 2 षटकारांमुळे हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. या सामन्याद्वारे धोनीने आयपीएलमधील आपल्या 5 हजार धावाही पूर्ण केल्या.
क्रिकेटशी संबंधित खालील बातम्या वाचा...
IPL मध्ये आज KKR vs RCB:कोलकाताविरूद्ध सलग दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार बंगळुरू; जाणून घ्या- संभाव्य प्लेइंग-11
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात लीग स्टेजचा सामना रंगणार आहे. सामना कोलकातामध्ये संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. केकेआरचे हे घरचे मैदान आहे. कोलकाता संघ 2019 नंतर प्रथमच येथे खेळणार आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी बाद फेरीचे सामने खेळण्यात आले होते. मात्र त्याआधी केकेआर लीगमधून बाहेर पडला होता. दुसरीकडे, गेल्या वर्षी आयपीएलच्या टप्प्यात केकेआर आणि आरसीबी आमनेसामने होते. ज्यामध्ये RCB चा विजय झाला होता.
या कथेत आपण जाणून घेऊया- हेड टू हेड रेकॉर्ड, अव्वल खेळाडू, खेळपट्टीचा अहवाल, हवामानाची स्थिती, संभाव्य खेळ-11 आणि दोन्ही संघांचे प्रभावशाली खेळाडू कोणते या विषयी... येथे वाचा संपूर्ण बातमी...
क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही धोनी प्रेरणादायी:द एक्सिडेंटल कॅप्टन, शेवटपर्यंत झुंजणारा... ज्याच्यासाठी पराभव म्हणजे THE END नाही
कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याला एकदिवसीय आणि टी-20 मध्ये देशाचे कर्णधारपद सोडून पाच वर्षे झाली आहेत. निवृत्तीला तीन वर्षे झाली. तरीही प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी त्याची आठवण ठेवतो आणि भारताला त्याच्यासारखा कर्णधार पुन्हा मिळावा अशी प्रार्थना करतो. आपण महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलत आहोत. तो आज 41 वर्षांचा झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताच्या 90 वर्षांच्या इतिहासातील धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खिताब जिंकण्याव्यतिरिक्त, धोनी कसोटी क्रिकेटमध्ये देशाला नंबर 1 बनवणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.