आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2022:सर्वात यशस्वी मुंबईचे खाते बंदच; मुंबईने केकेआरला आतापर्यंत 22 वेळा हरवले, मुंबई-कोलकाता आज सायं. 7.30 वा. भिडणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स बुधवारी भिडतील. हा १४ वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होईल. दोन्ही संघ प्रथमच या मैदानावर उतरतील. हा केकेआरचा चौथा व मुंबईचा तिसरा सामना आहे. केकेआरने ३ पैकी २ सामने जिंकले आणि संघ तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई संघ अद्याप विजयाचे खातेही उघडू शकला नाही. संघाने आपले दोन्ही सामने गमावले व संघ आठव्या क्रमांकावर आहे. मात्र, सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सचा केकेआर विरुद्ध आतापर्यंत आयपीएलमधील आलेख चांगला राहिला आहे. दोन्ही संघांत आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले. त्यात मुंबईने केकेआरला २२ सामन्यांत हरवले. केकेआरने केवळ ७ लढती जिंकल्या. गत पाचपैकी चार सामने मुंबईने आपल्या नावे केले आहेत. दोघांमधील अखेरचा सामना केकेआर जिंकला होता. पहिल्या सामन्यात केकेआरने चेन्नईला हरवले होते. त्यानंतर दुसऱ्या लढतीत संघाचा बंगळुरूविरूद्ध पराभव झाला.

दोघांतील गत ५ पैकी ४ सामन्यांत मुंबई विजयी
कोलकाता नाइट रायडर्स : व्यंकटेशनेला सुधारणा करावी

गेल्या सामन्यात अष्टपैलू व्यंकटेश अय्यर विशेष काही करू शकत नाही. संघाच्या विजयासाठी व्यंकटेशला फॉर्ममध्ये परतावे लागेल. कर्णधार श्रेयस, बिलिंग्ज व शेल्डन जॅक्सन यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. गेल्या सामन्यात रसेलने तुफानी कामगिरी केली. ते टिकून राहिल्यास निकाल फिरवू शकतात. उमेश यादवने आतापर्यंत गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम साउदीनेही फॉर्म परत मिळवला आहे. मावी, वरुण व नरेनकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

मुंबई इंडियन्स : मधली फळी, गोलंदाजीत सुधारणा हवी
आपल्या दोन्ही सामन्यांत मुंबईने उत्कृष्ट फलंदाजी केली. मात्र, गोलंदाज विशेष काही करू शकले नाही. सलामीवीर ईशान किशन फाॅर्मात आहे. त्याने गत दोन्ही सामन्यांत अर्धशतक ठोकले. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत मधली फळी ढेपाळली. संघाला आपली मधली व तळातील फळी मजबूत करावी लागेल. मात्र, गत सामन्यात तिलक वर्माने संघाचा डाव सावरला होता. बुमराहवर वेगवान आक्रमणाची जबाबदारी असेल.

बातम्या आणखी आहेत...