आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा सलग दुसरा पराभव:राजस्थानने केला 23 धावांनी पराभव, चहलने डेथ ओव्हर्समध्ये केली शानदार गोलंदाजी; पोलार्डच्या संथ फलंदाजीचा MI ला चांगलाच परिणाम

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्ये आज झालेल्या दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना RR ने 20 षटकात 193 धावा केल्या.MI ने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 170 रन काढले आहेत. ईशानने तिलक वर्मासोबत 81 धावांची भागीदारी केली. तो 54 धावा काढून आउट झाला. तर तिलक वर्मा 61 धावा काढून बाद झाला.

फॅक्ट ऑफ द मॅच
राजस्थानने मुंबईच्या विरोधात पहिले बॅटिंग करत जेव्हा जेव्हा 190 किंवा याच्या वरचा स्कोअर बनवला आहे. त्यांना विजय मिळाला आहे. मुंबईने 2014 मध्ये राजस्थानच्या विरोधात 190 धावांचे टार्गेट चेज केले होते. तेव्हा राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 189 धावा केल्या होत्या. मुंबईने 14.4 ओव्हरमध्येच 5 विकेट गमावून 195 धावा केल्या.

बटलरचे शतक

एक वेळ अशी होती की संघ 200 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते. RR साठी जोस बटलरने शतक ठोकले. या खेळीत त्याने 5 षटकार मारले. त्याचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे. मुंबईसाठी बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने 3 बळी घेतले. 19 व्या षटकात बुमराहने राजस्थानला दोन झटके दिले आणि त्याच षटकात एक रनआउट देखील झाला

प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबईने कोणताही बदल केलेला नाही. सूर्यकुमार यादव आरआरविरुद्धचा सामना खेळेल, असे मानले जात होते, मात्र आजही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. त्याचवेळी आरआरने नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी नवदीप सैनीला संधी दिली आहे.

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होईल. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, 2013 सालापासून पहिला सामना हरण्याचा विधी कायम ठेवत MI ने DC च्या हातून सामना 4 विकेटने पराभूत होत सीझनची सुरुवात केली. दुसरीकडे, लिलावादरम्यान चांगले कॉम्बिनेशन जुळवणारा राजस्थान संघ पहिल्या सामन्यात SRHचा 61 धावांनी पराभव केल्यानंतर मुंबईला भीडणार आहे.

हेड टू हेडमध्ये मुंबई थोडी पुढे
आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. यातील 13 सामने RRने तर 11 सामने MIने जिंकले होते. 1 सामना निकालाविना संपला. मुंबईने 2010 मध्ये राजस्थानविरुद्ध एका डावात सर्वाधिक 212 धावा केल्या होत्या, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या 92 होती. राजस्थानने मुंबईविरुद्ध एका डावात सर्वाधिक 208 धावा केल्या आहेत आणि त्यांची सर्वात कमी धावसंख्या 90 आहे. या दोघांच्या टक्करमध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक 416 धावा केल्या आहेत. यानंतर 316 धावा करणाऱ्या रोहित शर्माचा क्रमांक लागतो.

पंड्या बंधूंची कमतरता जाणवतेय
रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी MIला DCविरुद्ध शानदार सुरुवात करून दिली. एका क्षणी 220 च्या आसपास जाणारी धावसंख्या मिडिल ऑर्डरच्या पाठिंब्याशिवाय 177 वर थांबली. टीम डेव्हिड जगभरातील लीगमध्ये धुमाकूळ घालत राहिले आहेत, परंतु जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमधील सर्वात यशस्वी संघाचा दिर्घ काळ भाग होण्यासाठी त्यांना मोठ्या खेळी खेळण्याची सवय लावावी लागेल. युवा फलंदाज तिलक वर्माने आपल्या खेळाने नक्कीच प्रभावित केले, पण त्यालाही डाव लांबवता आला नाही. किरॉन पोलार्डच्या बॅटचे मौनही मुंबईसाठी अडचणीचे ठरत आहे.

मुंबईच्या गोलंदाजीत धार नव्हती
ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहची जोडी तुटल्याचा परिणाम दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही स्पष्टपणे दिसून आला. बुमराहने त्याच्या गोलंदाजीत 43 धावा दिल्या, तर त्याचा साथीदार डॅनियल सॅम्सने 4 षटकात 57 धावा दिल्या. दोघांनाही यश मिळाले नाही.

बासिल थंपी आणि एम. अश्विन यांनी थोडी चांगली गोलंदाजी केली, पण ती संघाला जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती. बुमराहच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांना सहज शॉट्स खेळता येणे ही MI संघ व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. जर एमआयला चॅम्पियन संघाप्रमाणे प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर संघाच्या गोलंदाजीला एक युनिट म्हणून कामगिरी करावी लागेल.

राजस्थान हा या स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ मानला जात आहे
प्रत्येक वेळी तरुण आणि अननुभव नसलेल्या खेळाडूंवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे पहिल्या सीझनपासून सतत पराभवाचा सामना करत असलेल्या RRचे नशीब लिलावानंतर चमकले आहे. टॉप ऑर्डरमध्ये देवदत्त पडिक्कल आणि हेटमायर यांचे आंगमन झाल्यामुळे फलंदाजीची क्रमवारी मजबूत झाली आहे. तसेच आर. अश्विन, जिमी नीशम, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट हे आल्याने गोलंदाजी युनिट नव्याने जिवंत झाले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरआर हरेल असे वाटले नाही. अशा स्थितीत 5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईविरुद्धची स्पर्धा बरोबरीची होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...