आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या १५ व्या सत्रातील दुसरा डबल हेडर शनिवारी खेळवला जाईल. पहिला सामना मंुबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल. मुंबईने आपला पहिला सामना दिल्लीविरुद्ध गमावला होता आणि राजस्थानने हैदराबादविरुद्ध विजय मिळवला होता. मुंबई व राजस्थान संघ २७ वेळा समोरासमोर आले आहेत, ज्यात मुंबईने १४ आणि राजस्थानने १२ सामने जिंकले. एका सामन्याचा निकाल लागला नाही. मुंबईकडे राजस्थानविरुद्ध विजयाची हॅट््ट्रिक करण्याची संधी आहे. गत सत्रातील दोन्ही सामने मुंबईने आपल्या नावे केले होते. दुसरीकडे, दुसरा सामना सायंकाळी ७.३० वाजता गुजरात सुपर जायंट्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. दोन्ही संघांनी आपापला पहिला सामना जिंकला आहे.
सूर्यकुमार तंदुरुस्त, राजस्थानविरुद्ध उपलब्ध होणार : जहीर खान
मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक जहीर खानने म्हटले की, जहीर खानने म्हटले की, कायम ठेवलेला खेळाडू सूर्यकुमार यादव तंदुरुस्त झाला आहे आणि तो राजस्थानविरुद्ध सामन्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यकुमार संघाचा प्रमुख खेळाडू आहे. आम्ही त्याच्या मैदानात उतरण्याची प्रतीक्षा करत आहोत. त्याने मुंबईसाठी सलग विजयी खेळी केल्या आहेत. त्यामुळे तो संघाचा प्रमुख कोर सदस्य बनला आहे. तो नंबर-१ ते नंबर-६ पर्यंत कुठल्याही स्थानावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. मात्र, त्याने नंबर-३ वर आपले स्थान सुरक्षित केले आहे. संघ नेहमी गरजेनुसार त्याचा उपयोग करून घेतो, तो सध्या आपल्या भूमिकेत यशस्वी ठरतोय.’ जहीरने म्हटले की, सुरूवातीच्या सामन्यादरम्यान सलामीवीर ईशान किशन पायाच्या अंगठ्याला लागलेल्या दुखापतीतून सावरला असून तो खेळण्यासाठी फिट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.