आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर:मुंबईचा चेन्नईवर 5 गडी राखून विजय, 97 धावांवर ऑलआऊट झाला होता धोनीचा संघ

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या या हंगामातील 59 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 97 धावा केल्या आणि मुंबईला विजयासाठी 98 धावांचे आव्हान दिले. धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या 14.5 षटकात हे आव्हान पार केल आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.

चेन्नईप्रमाणेच मुंबईच्या डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर इशान किशन 6 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा 18 धावा करुन बाद झाला. यानंतर डॅनियल सॅम्स हाही एक धाव काढून बाद झाला. पाठोपाठ स्टब्सही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर काहीसा मुंबईचा डाव सावरला आणि संथ धावसंख्येने चाललेला सामना मुंबईने जिंकला.

या सामन्याचा लाईव्ह स्कोेअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चेन्नईच्या डावातील पहिल्या षटकातच मुंबईचा गोलंदाज सॅम्स याने जोरदार झटका दिला. मोईन अली आणि काॅनवे या दोघांना त्याने बाद केले. पहिल्या षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर सामन्याचे दुसरे षटक जसप्रित बुमराहने टाकले. त्यात चौथ्याच चेंडूवर त्याने चेन्नईच्या रॉबिन उथप्पाला पायचित केले. 16 षटकात चेन्नईचा स्कोअर सर्वबाद 97 झाला आहे.

ऋतूराज गायकवाड सॅम्सच्या गोलंदाजीवर किपरकडे झेल देऊन तंबुत परतला. तर मेरेडिथच्या गोलंदाजीवर शिवम दुबेचा झेल विकेटकिपरने टिपला. डेव्हेन ब्राव्होही 12 धावा करुन बाद झाला, त्यानंतर समरजीतही पाठोपाठ दोन धावांवर बाद झाला. 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तीक्षणा बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा प्रयत्न अपुरा ठरला.

16 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नांत मुकेश धावबाद झाला. यामुळे चेन्नईचा संघ अवघ्या 97 धावांतच गारद झाला. चेन्नईचा आयपीएलमधील हा दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2013 मध्ये चेन्नईने मुंबईविरोधातच अवघ्या 79 धावा केल्या होत्या.

सामन्याचे हायलाईट्स

गतविजेता चेन्नई प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर

आज झालेल्या पराभवानंतर गतविजेता सीएसके प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता चेन्नईने शेवटचे दोन सामने जिंकले तरी त्यांचे केवळ 12 गुण होतील. चार संघांनी आधीच 14 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. मुंबईचा संघ आधीच प्ले ऑफ स्प्रिमधून बाहेर पडला आहे.

पहिल्याच षटकापासून रुळावरून घसरली चेन्नई एक्सप्रेस

सामन्याच्या पहिल्याच षटकात डॅनियल सॅम्सने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. चेंडू लेग स्टंप चुकवू शकतो असे रिप्लेत दिसले. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने डीआरएस उपलब्ध झाला नाही. यामुळे कॉनवेला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यानंतर सॅम्सने षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोईन अलीला (0) बाद केले.

जसप्रितनेही केली घातक गोलंदाजी

दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केले. यावेळीही डीआरएस उपलब्ध नव्हता. मात्र, उथप्पाने बाहेर पाहिले. काही काळानंतर डीआरएस उपलब्ध झाला. सॅम्सने तिसर्‍या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गायकवाडला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले.

MI बद्दल बोलायचे झाले तर, त्याने 11 सामन्यांमध्ये फक्त 2 जिंकले आहेत आणि त्याचा निव्वळ रन रेट -0.894 आहे. CSK ने देखील आतापर्यंत 11 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. चेन्नईचा निव्वळ धावगती +0.028 आहे.

असा आहे संघ

दोन्ही संघ दिग्गज खेळाडूंनी भरलेले आहेत, त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, फॅंटेसी संघात कोणते खेळाडू अधिक गुण मिळवू देवू शकतात हे पाहुया

विकेटकीपर

इशान किशन आणि महेंद्रसिंग धोनी यांना यष्टिरक्षक म्हणून संघात घेतले जाऊ शकते. इशानची बॅट अपेक्षेप्रमाणे नक्कीच बोलली नाही, पण मागच्या वर्षीही जेव्हा संघ फेरीतून बाद झाला त्यानंतर इशानने दमदार खेळी केली होती

तो चेन्नईविरुद्ध कोणत्याही दडपणाशिवाय मोठा डाव खेळू शकतो. महेंद्रसिंग धोनी या सीझनमध्ये जबरदस्त टचमध्ये दिसला आहे. तो थोडा वरच्या फळीत फलंदाजीसाठी आला असता तर कदाचित चेन्नईची गुणतालिकेत चांगली स्थिती असती. फॅन्टसी पॉइंट्समध्ये माहीचा फॉर्म मिळू शकतो.

फलंदाज

डेव्हॉन कॉनवे, रोहित शर्मा, टीम डेव्हिड आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी चेन्नईला झटपट सुरुवात करून तुमचे फँटसी पॉइंट जिंकण्याचा वेग वाढवू शकते. सलग तीन अर्धशतके झळकावणारा कॉनवे झंझावाती फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्मा अनेकदा चेन्नईविरुद्ध शानदार फलंदाजी करतो. गेल्या सामन्यात कोलकाताविरुद्धच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरलेला रोहित आजच्या सामन्यात दीर्घ खेळी खेळू शकतो.

ऋतुराजने 99 धावांची दमदार खेळी खेळून हे सिद्ध केले आहे की, सध्या खेळत असलेल्या युवा खेळाडूंमध्ये तो सर्वात प्रतिभावान खेळाडू आहे. ऋतुराज मुंबईविरुद्ध फलंदाजीत रंगत आणू शकतो.

किरॉन पोलार्डच्या जागी मुंबईचा नवा फिनिशर म्हणून टीम डेव्हिडकडे पाहिले जात आहे. दिग्गज गोलंदाजांसमोर मोठे फटके खेळून आपल्यातील प्रतिभेची कमतरता नाही हे त्याने सिद्ध केले आहे. CSK वर तो जड ठरु शकतो.

अष्टपैलू

मोईन अली हा जागतिक क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. दिल्लीविरुद्ध 4 षटकांत 13 धावांत तीन बळी घेणाऱ्या मोईनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचा मार्गच बदलून टाकला. मोईन आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने मुंबईविरुद्धही उपयुक्त ठरू शकतो.

गोलंदाज

ड्वेन ब्राव्हो, जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन आणि महेश तिक्षणा हे गोलंदाज म्हणून फायदेशीर ठरू शकतात. ब्राव्हो हा या मोसमात चेन्नईसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि त्याचे संथ चेंडू फलंदाजांवर परिणाम करत आहेत.

जसप्रीत बुमराहने कोलकाताविरुद्ध अवघ्या 10 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. भारतातील सर्वात मोठ्या स्पीड स्टारने पुन्हा वेग पकडला आहे असे म्हणणे पुरेसे आहे. चेन्नईविरुद्धही बुमराह गेम चेंजर ठरू शकतो. मुंबईसाठी मुरुगन अश्विन उत्कृष्ट फिरकी गोलंदाजी करत आहे. त्यांचा फॉर्म फायदेशीर ठरु शकतो.

महेश तिक्षणा आपल्या गूढ फिरकीने फलंदाजांना वेठीस धरु शकतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...