आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाताच्या IPLमध्ये आशा कायम:मुंबईवर 52 धावांनी विजय, 13 धावात झाले 6 फलंदाज गारद, बुमराहची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीही ठरली व्यर्थ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल 2022 च्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या कोलकाता नाइट रायडर्सच्या आशा कायम आहेत. सोमवारी झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा 52 धावांनी पराभव केला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 10 धावांत पाच विकेट घेत आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, मुंबईच्या फलंदाजांनी त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले. 17.3 षटकात 113 धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. इशान किशनने सर्वाधिक 51 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावाही करता आल्या नाहीत.

या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या निकालानंतर केकेआरचे 12 सामन्यांत 10 गुण झाले असून ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोलकाताला त्यांचे शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागतील तसेच नेट रनरेटच्या बाबतीतही पुढे राहावे लागेल. मुंबईचा संघ आधीच स्पर्धेबाहेर आहे. केवळ 2 विजयांसह 11 सामन्यांतून 4 गुणांसह संघ 10व्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.

सामन्याचे हायलाईट्स

कमिन्सने एका षटकात तीन विकेट घेत मुंबईला केले गारद

मुंबईच्या संघाने 14 षटकांत 4 गडी गमावून 100 धावा केल्या होत्या आणि विजयाच्या शर्यतीत उपस्थित होता. पण, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने 15 व्या षटकात तीन बळी घेत मुंबईला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले. या षटकात कमिन्सने प्रथम इशान किशनची विकेट घेतली. यानंतर त्याने डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विनला पॅव्हेलियनमध्ये फिरायला पाठवले.

3 खेळाडू रनआऊट जबाबदार पोलार्ड

किरॉन पोलार्ड (15) याने थोडा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या खराब धावांमुळे मुंबईला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. मुंबईच्या डावात पोलार्डसह तीन फलंदाज धावबाद झाले आणि तीन वेळा पोलार्डची चूक झाली.

मोसमात बुमराह पहिल्यांदाच रंगात दिसला

बुमराहने आंद्रे रसेल, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनील नरेन यांची विकेट घेतली. त्याने दुसऱ्या षटकात दोन आणि तिसऱ्या षटकात तीन बळी घेतले. तिसरे षटकही मेडन होते. आपल्या डावातील चौथ्या आणि शेवटच्या षटकात मुंबईच्या या वेगवान गोलंदाजाने फक्त 1 धाव दिली.

कोलकाताची मोसमातील सर्वोत्तम सलामीची भागीदारी

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाताने चांगली सुरुवात केली. अय्यर आणि रहाणेने पहिल्या विकेटच्या भागीदारीत 60 धावांची भर घातली. केकेआरकडून या मोसमातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. यापूर्वीचा विक्रम 43 धावांचा होता. वेंकटेश आणि रहाणेने 26 मार्च रोजी चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ही कामगिरी केली होती.

श्रेयसच्या संघाला गाठता आला नाही दोनशेचा टप्पा

कोलकाता नाईट रायडर्सने 14 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 136 धावा केल्या. त्यानंतर संघाला 200 धावांचा टप्पा गाठता येईल असे वाटत होते. पण, यानंतर बुमराहने कहर म्हणून संघात प्रवेश केला. त्याने 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आंद्रे रसेलला आणि पाचव्या चेंडूवर नितीश राणाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 18व्या षटकात पुन्हा गोलंदाजी करायला आलेल्या बुमराहने जॅक्सन, कमिन्स आणि नरेनचे बळी घेतले. बुमराह एकदा हॅट्ट्रिकवर होता, पण त्याला ती गाठता आली नाही.​​​​​​​

दुखापतग्रस्त सूर्यकुमार स्पर्धेतून बाहेर

सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला. संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रमणदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर केकेआरने प्लेइंग-11 मध्ये 5 बदल केले होते. अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि शेल्डन जॅक्सनचे पुनरागमन आज संघात झाले.

बातम्या आणखी आहेत...