आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL:बंगळुरूच्या पराभवानंतर नवीनच्या मीमचीच चर्चा, इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले मीम, विराटचे चाहते नाराज

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या 70 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवल्यानंतर लखनऊ सुपर जायंटसचा गोलंदाज नवीन उल हकने ठेवलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन उल हकने एक मीम इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवून आरसीबीच्या एलिमिनेशनवरून फिरकी घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

काय आहे मीम

अतिशय जोरकसपणे हसणाऱ्या एका प्रेझेंटरचे मीम नवीन उल हकने सामना संपल्यानंतर लगेचच शेअर केले. गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर बंगळुरूचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. बंगळुरूच्या पराभवासह मुंबईचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाला. बंगळुरू प्लेऑफसाठी क्वालिफाय न झाल्याने नवीन उल हकने या मीमच्या माध्यमातून विराटची फिरकी घेतल्याचे मत आता सोशल मीडिया युझर्स व्यक्त करत आहेत.

आयपीएल सामन्यादरम्यान झाला होता वाद

विराट कोहली आणि नवीन उल हकदरम्यान 1 मे रोजीच्या आयपीएल सामन्यादरम्यान वाद झाला होता. या सामन्यादरम्यान आणि सामन्या संपल्यानंतरही दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर तसेच लखनऊचे इतर खेळाडूही यात मध्ये पडले. यावेळी विराट अतिशय आक्रमक दिसला होता. त्यामुळे नवीन उल हकच्या या मीमला याच वादाची किनार असल्याची चर्चा आता सुरू आहे.

पाहा ते मीम

या बातम्याही वाचा...

विराट-नवीन उल हक वाद:नवीन म्हणाला- मी आयपीएल खेळण्यासाठी आलो, कोणाकडून शिव्या ऐकण्यासाठी नाही

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आला. नवीनने एक इंस्टाग्राम पोस्ट केली होती, जी विराट कोहलीशी जोडली जात आहे. विराटसोबत झालेल्या वादानंतर नवीनने त्याच्या एका सहकाऱ्याला सांगितले की, तो आयपीएल खेळण्यासाठी आलेला आहे. तो कोणाच्याही शिव्या ऐकण्यासाठी आलेला नाही. (वाचा पूर्ण बातमी)

विराट कोहली - गौतम गंभीर वाद संपला नाही, आता अफगाणिस्तानच्या प्लेअरने ओतले 'आगीत तेल'

आयपीएल स्पर्धा आता एकाहून एक रंजक सामन्यांच्या माध्यमातून आपल्या अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करत आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन उल हक व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली मैदानातच एकमेकाना भिडले होते. या वादामुळे विराट कोहली व गौतम गंभीर एकमेकांपुढे आले होते. याची माध्यमांत खमंग चर्चा रंगली होती. (वाचा पूर्ण बातमी)