आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • Neither Team's Play off Entry Is Guaranteed After 11 Matches, With 9 Teams Vying; Outside Mumbai, Lucknow Gujarat Playoffs One Step Further

यंदाचे आयपीएल ओपन:11 सामन्यांनंतर एकाही संघाचा प्ले ऑफ प्रवेश निश्चित नाही, 9 संघांमध्ये चुरस; मुंबई बाहेर, लखनऊ-गुजरातचा प्ले ऑफ एका पावलावर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचे यंदाचे १५ वे सत्र हे अधिकच रोमांचक ठरत आहे. आतापर्यंतच्या इतर सीझनपेक्षा हे सत्र वेगळे ठरत आहे. आतापर्यंत सर्वच संघांनी प्रत्येकी ११ सामने खेळले आहेत. तसेच कोलकाता आणि बंगळुरूच्या नावे प्रत्येकी १२ सामन्यांची नोंद आहे. मात्र, तरीही अद्याप एकाही संघाला यंदा आयपीएलच्या प्लेऑफ मधील प्रवेश निश्चित करता आला नाही. मात्र, यासाठी नऊ संघांत चुरस रंगत आहे. नवव्या पराभवाने मुंबई संघाच्या आशा धुळीत मिळाल्या. सात पराभवानंतरही चेन्नई टीमची संधी अद्यापही कायम आहे.

लखनऊ संघ : सामने 11, गुण 16, नेट रनरेट 0.703 उर्वरित सामने: vs गुजरात, राजस्थान, कोलकाता - लखनऊने गत ४ सामन्यांत विजयासह अव्वल स्थान गाठले. व रन रेटमध्येही आघाडी घेतली. आता एका विजयाने प्ले ऑफ प्रवेश निश्चित होईल. टाॅप-२ मधील स्थान कायम ठेवताना लखनऊला फायनल गाठण्यासाठी दोन संधी आहेत. संघाने उर्वरित तीनही सामने गमावले तर १६ गुण राहतील. मात्र, रन रेटच्या आधारे संघ फायनलसाठी पात्र ठरेल.

गुजरात टायटन्स: मॅच 11, गुण 16, नेट रनरेट 0.120 उर्वरित सामने: vs लखनऊ, चेन्नई, बंगळुरू - सलग दोन सामने गमावल्याने गुजरातची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. मात्र, तरीही संघाला सहज प्ले ऑफ प्रवेश करता येईल. या टीमला शेवटच्या तीनपैकी एका सामन्यात विजय आवश्यक आहे. मात्र, यातील तिन्ही पराभवाने संघाचा प्रवेश अडचणीत येईल. यासाठी टीमला इतर संघांच्या रन रेटवर अवलंबून रहावे लागेल.

राजस्थान रॉयल्स: मॅच 11, गुण 14, नेट रनरेट 0.326 उर्वरित सामने: vs दिल्ली, लखनऊ, चेन्नई

- सॅमसनच्या राजस्थान संघाला प्ले ऑफ प्रवेशासाठी दोन विजयाची गरज आहे. त्यामुळे रन रेट उंचावत टीम ही लखनऊशी बरोबरी साधू शकेल. मात्र, तरीही संघाला सर्वाेत्तम कामगिरी करावी लागणार आहे. चारही सामन्यांतील पराभवाने राजस्थानचा प्रवेश अडचणीत येईल. त्यामुळे टीमला विजयासह रन रेटही उंचाववा लागणार आहे.

बंगळुरू : सामने 12, गुण 14, नेट रनरेट -0.115 उर्वरित सामने: vs दिल्ली, लखनऊ, चेन्नई - सॅमसनच्या राजस्थान संघाला प्ले ऑफ प्रवेशासाठी दोन विजयाची गरज आहे. त्यामुळे रन रेट उंचावत टीम ही लखनऊशी बरोबरी साधू शकेल. मात्र, तरीही संघाला सर्वाेत्तम कामगिरी करावी लागणार आहे. चारही सामन्यांतील पराभवाने राजस्थानचा प्रवेश अडचणीत येईल. त्यामुळे टीमला विजयासह रन रेटही उंचाववा लागणार आहे.

बंगळुरू : सामने 12, गुण 14, नेट रनरेट -0.115 उर्वरित सामने: vs पंजाब, गुजरात - बंगळुरू संघाचेही राजस्थानसारखेच १४ गुण आहेत. मात्र, बंगळुुरूने एक सामना अधिक खेळला आहे. यातील सुमार खेळीने रन रेटमध्ये घसरण झाली. त्यामुळे टीमसाठी आगामी दोन्ही सामने कठीण आहेत. यातील विजयाने टीमला प्रवेश निश्चित करता येणार आहे. या विजयाने संघाच्या नावे १८ गुणांची नोंेद होईल.

दिल्ली कॅपिटल्स मॅच 11, गुण 10, नेट रनरेट 0.150 उर्वरित सामने : vs राजस्थान, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स

सनरायझर्स हैदराबाद मॅच 11, गुण 10, नेट रनरेट -0.031 उर्वरित सामने: vs कोलकाता, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज

पंजाब किंग्ज : मॅच 11, गुण 10, नेट रनरेट -0.231 उर्वरित सामने : vs बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद दिल्ली, हैदराबाद व पंजाब संघांंचे सारखेच गुण आहेत. तिन्ही संघांना प्लेऑफ प्रवेश करण्याची संधी आहे. यासाठी आगामी सामन्यांत विजय आवश्यक आहे. त्यामुळे संघ १६ गुणांची कमाई करू शकतील. यादरम्यान उंचावलेला रनरेटही महत्त्वपूर्ण ठरेल. त्यावरच हा प्रवेश निश्चित आहे. तसेच या संघांना राजस्थान-बंगळुरू टीमच्या पराभवाचा मोठा फायदा होऊ शकताे.पंजाब संघाला आता बलाढ्य हैदराबादपाठाेपाठ बंगळुरू व दिल्लीविरुद्ध खेळावे लागेल.

कोलकाता संघ : सामने 12, गुण 10, नेट रनरेट -0.057 उर्वरित सामने : vs हैदराबाद, लखनऊ चेन्नई सुपरकिंग्ज : मॅच 11, गुण 8, नेट रनरेट 0.028 उर्वरित सामने : vs मुंबई, गुजरात, राजस्थान - गत उपविजेत्या कोलकाताची स्थिती ही चेन्नईसारखीच आहे. टीमला उर्वरित सामन्यांत विजय आवश्यक आहे. इतर संघांच्या जय-पराजयाचाही मोठा फायदा या संघाला होईल.

बातम्या आणखी आहेत...