आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPLच्या 15व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. RCBचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. RCBला मुंबई इंडियन्सविरुद्ध एकमेव विजय मिळाला. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने लखनऊविरुद्ध अर्धशतक झळकावले, पण त्याचा संघ विजय मिळवू शकला नाही.
सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि समालोचक सायमन डूल यांनी विराटवर मोठा आरोप केला. ते म्हणाले की, कोहलीला फक्त त्याच्या रेकॉर्डची काळजी आहे. सायमन डूल यांनी कोहलीच्या अर्धशतकाचा हवाला दिला. विराटने एकवेळ 25 चेंडूंत 42 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्या 8 धावांसाठी त्याने 10 चेंडू घेतले. RCBच्या माजी कर्णधाराने 35 चेंडूंत अर्धशतक ठोकले.
काय म्हणाले सायमन डूल?
यावर प्रतिक्रिया देताना सायमन डूल म्हणाले, कोहलीची सुरुवात एखाद्या हायस्पीड ट्रेनसारखी झाली. तो वेगवान फटके मारत होता. आपण हातोडा चालवतोय असे त्याला वाटत होते. नंतरच्या 42 वरून 50 पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 10 चेंडू लागले. त्याला त्याच्या विक्रमाची काळजी वाटत होती. या खेळात अशा वागण्याला जागा आहे असे मला वाटत नाही. तुमच्याकडे भरपूर विकेट शिल्लक असताना तुम्ही धावा करत राहायला हव्यात.
काय घडलं मॅचमध्ये?
RCBने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने नऊ गडी गमावून 213 धावा केल्या आणि अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. तो एका विकेटने जिंकला. या विजयासह लखनऊचे चार सामन्यांतून 6 गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.
या सामन्यात RCBकडून विराट कोहलीने 44 चेंडूंत 61, ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूंत 59 आणि कर्णधार फाफ डुप्लेसिसने 46 चेंडूंत नाबाद 79 धावा केल्या. त्याचवेळी लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने 30 चेंडूंत 65 आणि निकोलस पूरनने 19 चेंडूंत 62 धावा केल्या.
संबंधित बातमी..
LSG-RCB सामन्याचे टॉप मोमेंट्स: 19व्या षटकात बडोनीची हिट विकेट; पुरनची 15 बॉलमध्ये फिफ्टी, डू प्लेसिसने ठोकला सर्वात लांबीचा सिक्स
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सोमवारी झालेल्या एका रोमांचक सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतक ठोकले. दुसऱ्या डावात मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांच्या जोरदार खेळीने LSG सामना जिंकला. येथे वाचा सविस्तर वृत्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.