आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली बातमी नाही. संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे IPL मधून बाहेर पडला आहे. रिपोर्टनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला. दुखापतीमुळे तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर होता.
चेन्नईचे बाकी आहेत 3 सामने
चेन्नईचे 8 गुण आहेत आणि 3 सामने बाकी आहेत. चेन्नई अशा स्थितीत आहे की त्यांना 14 गुण मिळविण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकायचे आहेत आणि त्यांना उर्वरित संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. 4 संघांचे 14 गुण असल्याने धावगतीही महत्त्वाची ठरणार आहे.
8 सामन्यांनंतर सोडले कर्णधारपद
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या २ दिवस आधी CSK चे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले. मात्र 8 सामन्यांनंतरच जडेजाने पुन्हा महेंद्रसिंगकडे कर्णधारपद सोपवले. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाने दोन सामने जिंकले.
या हंगामात जडेजा ठरला फ्लॉप
येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की लीगच्या चालू हंगामात जडेजा CSK साठी चांगलाच महागात पडला आहे. फ्रँचायझीने त्याला तब्बल 16 कोटी रुपये देऊन कायम ठेवले. इतकंच नाही तर त्याच्याकडे संघाचं कर्णधारपदही सोपवण्यात आलं, पण तो फ्रँचायझी आणि चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. जडेजाच्या नेतृत्वाखाली CSK ने 8 पैकी 6 सामने गमावले. इतकंच नव्हे तर जडेजाची कामगिरीही विशेष नव्हती. त्याने 10 सामन्यांमध्ये केवळ 116 धावा केल्या आहेत, नाबाद 26 धावा ही या मोसमातील सर्वोत्तम ठरली आहे. त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर या सामन्यांमध्ये जडेजाला केवळ पाच विकेट घेता आल्या आहेत. त्याच्या लीगमधील आकडेवारी पाहता या खेळाडूने 210 सामन्यांच्या 161 डावांमध्ये 2502 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.