आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्याप्रकारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोरोनामुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, तशाच प्रकारचा निर्णय BCCI ला इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी घ्यावा लागू शकतो. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) मधील दोन खेळाडून कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आजचा कोलकाता विरुद्ध बंगळुरुचा सामना रद्द करण्यात आला.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात PSL ची सुरुवात झाली होती, पण 6 खेळाडूंहस 8 जण कोरोना संक्रमित झाले होते. तोपर्यंत टुर्नामेंटमधील 14 सामनेदेखील झाले होते, तरीदेखील लीग रद्द करण्यात आली. आता उर्वरितसामने जूनमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाचप्रकारे आयपीएलमध्येही आतापर्यंत सात खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता आयपीएलबाबत काय निर्णय घेतला जातो, हे पाहावं लागेल.
आतापर्यंत सात खेळाडू आणि इतर स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण
रिपोर्ट्सनुसार, चेन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजीसह दोन स्टाफ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, किंग्स इलेवन पंजाबमधील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. IPL मध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी KKR चा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी, नीतीश राणा (KKR), अक्षर पटेल (DC), डेनियल सैम्स (RCB), एनरिक नॉर्खिया (DC) आणि देवदत्त पडिक्कल (RCB) ला कोरोनाची लागण झाली आहे.
IPL ची सकारात्कम बाजू
KKR मध्ये वरुण आणि संदीप वॉरियरशिवाय इतर सर्व खेळाडूंची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. आता अशी चर्चा होत आहे की, आयपीएलमधील इतर उर्वरित सामने कोणत्याही दोन मैदानात करण्यात यावे. यामुळे खेळाडूंना लांबचा प्रवास करण्याची गरज पडणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.