आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीसाठी पुढे आला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर:पॅट कमिंसने PM केयर्स फंडात केली 38 लाख रुपयांची मदत

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी भारतावर प्रेम करतो, सध्याची परिस्थिती पाहून त्रास होतोय - कमिंस

ऑस्ट्रेलियाचा उप-कर्णधार आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळणारा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने कोरोनाशी सामना करण्यासाठी PM केयर्स फंडात 50 हजार डॉलर (38 लाख रुपये) डोनेट केले आहेत. त्यांनी हे पैसे भारतातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा वाढवण्यासाठी दिले. कमिंस म्हणाला की, आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांसाठी आयपीएल मनोरंजनाचे मोठे साधन आहे. यातुन आम्ही त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.

''भारतातील लोकांचे कष्ट पाहून दुःखी''

डोनेशनची घोषणा करताना कमिंसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने म्हटले की, मी भारतावर खूप प्रेम करतो. या देशातील लोक खूप चांगले आहेत. सध्या यांना कोरोनामुळे खूप काही सहन करावं लागत आहे, हे पाहून मला त्रास होत आहे. काही लोकांचे म्हणने आहे की, अशा महामारीच्या काळात आयपीएल करण्याचा काय फायदा, पण काहीजण टुर्नामेंटबद्दल पॉझिटिव्ह आहेत. या आयपीएलमुळे आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांना आनंद मिळतो.

''भारत सरकारला ऑक्सीजन सप्लायमध्ये मदत मिळेल''
कमिंसने पुढे लिहीले की, एक खेळाडू असल्यामुळे आम्हाला कोट्यावधी लोकापर्यंत पोहचता येते. याचा आम्ही चांगला उपयोग करू शकतो. हा विचार करुनच मी पीएम केयर्स फंडात मदत केली. यामुळे भारत सरकारला आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सप्लाय करण्यास मदत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...