आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलमध्ये बुधवारी दोन सामने होणार आहेत. दिवसाचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर होणार आहे.
या बातमीत जाणून घ्या, फॅन्टसी-11 च्या अव्वल खेळाडूंबद्दल. त्यांचा आयपीएल रेकॉर्ड आणि भूतकाळातील कामगिरी, ज्यावरून तुम्ही तुमच्या संघात कोणाचा समावेश करू शकता…
विकेटकिपर
ईशान किशनला यष्टिरक्षक म्हणून घेतले जाऊ शकते. या मोसमात ईशानने 8 सामन्यात 211 धावा केल्या आहेत. ओपनिंग करतो आणि मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे.
फलंदाज
तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंह यांना फलंदाज म्हणून घेतले जाऊ शकते.
ऑलराउंडर
कॅमरून ग्रीन, सिकंदर रझा आणि सॅम करन यांना अष्टपैलू खेळाडूंमध्ये घेतले जाऊ शकते.
बॉलर
पियुष चावला, अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा यांना गोलंदाजीत घेतले जाऊ शकते.
कर्णधार कोणाला बनवावे?
कॅमरून ग्रीनची कर्णधार म्हणून निवड होऊ शकते. या मोसमात त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपदी सूर्यकुमार यादव किंवा शिखर धवन यांची निवड करू शकता.
टीप : अलीकडील रेकॉर्ड आणि संभावनांच्या आधारे माहिती दिली आहे. हे मूल्यांकन सामन्यात योग्य किंवा चुकीचे असू शकते. संघ निवडताना फँटसी लीगशी संबंधित जोखीम लक्षात ठेवा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.