आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पेत्रा क्विताेव्हा पहिल्यांदाच मियामी ओपनची चॅम्पियन

मियामी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन पेत्रा क्विताेव्हा करिअरमध्ये पहिल्यांदाच मियामी ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने रविवारी स्पर्धेच्या महिला एकेरी गटाचा किताब पटकावला. यासह तिला मान्यवरांच्या हस्ते ट्राॅफी आणि १० काेटींचे बक्षीस देऊन गाैरवण्यात आले. झेक गणराज्यच्या या टेनिसपटूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये विम्बल्डन चॅम्पियन एलिना रायबकिनाचा सरळ दाेन सेटमध्ये पराभव केला.

१५ व्या मानांकित क्विताेव्हाने ७-६, ६-२ अशा फरकाने अंतिम सामन्यात विजयाची नाेंद केली. यासह तिने रायबकिनाच्या सलग १३ विजयाच्या माेहिमेला ब्रेक लावला. याच पराभवामुळे रायबकिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. क्विताेव्हाने १३ प्रयत्नानंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह तिने आपल्या नावे ३० वा डब्ल्यूटीएचा किताब नाेंदवला.