आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन प्रीमियर लीग( IPL)चे 14वे सीजन कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यातच आता, मुंबईतील एका वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. यात BCCI कडे 1000 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने म्हटले की, या पैशातून मेडिकल सपोर्ट सिस्टीम आणि ऑक्सीजन सप्लाय इक्विपमेंट खरेदी करता येतील. चीफ जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस गिरीश कुलकर्णी या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेतील.
याचिकाकर्त्याची मागणी
मुंबईतील वकील वंदना शाह यांनी ही याचिका दाखल केली आहे. वंदना यांनी म्हटले की, मी स्वतः क्रिकेटची चाहती आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत खेळापेक्षा आयुष्य जास्त महत्वाचे आहे.
BCCI ने म्हटले- आम्ही सुरक्षेशी कुठलीच तडजोड करणार नाही
BCCI ने IPL स्थगित केल्यानंतर म्हटले की, आम्ही खेळाडून, सपोर्ट स्टाफ आणि आयपीएलमधील कुठल्याच व्यक्तीच्या सुरक्षेसोबत तडजोड करू शकत नाहीत. त्यामुळेच सर्व स्टेकहोल्डर्सची बाजून ऐकून हा निर्णय घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.