आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल:हैदराबादची वाट खडतर; आज सुपरकिंग्जचे आव्हान, दिल्लीत आज सत्रातील पहिला आयपीएल सामना

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार डेव्हिड वाॅर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघ आता आयपीएलमध्ये पुन्हा विजयी ट्रॅकवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हैदराबादसाठी विजयाची ही वाट अधिकच खडतर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघासमोर दिल्लीच्या मैदानावर आज बुधवारी धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज टीमचे तगडे आव्हान असेल. चार विजयांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आता पाचवा विजय संपादन करण्याच्या इराद्याने चेन्नईचे सुपरकिंग्ज आज मैदानावर उतरतील. या सामन्यात चेन्नई संघाच्या विजयाचे पारडे जड मानले जाते. सुमार खेळीमुळे हैदराबाद टीम अडचणीत सापडली आहे. गत सामन्यातील पराभवाने हैदराबाद संघाची तळात आठव्या स्थानावर घसरण झाली.

दिल्लीच्या काेटला स्टेडियमवर यंदाच्या सत्रातील पहिला आयपीएल सामना बुधवारी रंगणार आहे. या मैदानावर सत्रात विजयाचे खाते उघडण्याचा चेन्नई संघाचा मानस आहे. यासाठी धोनीच्या नेतृत्वात खेळाडूंनी कंबर कसली आहे. गत सत्रामध्ये चेन्नई संघाला प्ले आॅफमध्ये प्रवेश करता आला नाही. यंदा सलगच्या विजयातून चेन्नईने आपला हा दावा मजबूत केला आहे.

जडेजा, ऋतुराजवर नजर :
काेहलीच्या बंगळुरू संघाविरुद्ध गत सामन्यात रवींद्र जडेजाने चेन्नईला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्यामुळे आता हैदराबाद संघाविरुद्ध सामन्यातही त्याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची आशा आहे. याशिवाय टीमचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडही चांगली खेळी करत आहे. गत सामन्यातील अर्धशतकी खेळीतून फाफ डुप्लेसिसनेही स्पर्धेत दमदार पुनरागमन केले.

हैदराबादविरुद्ध सुपरकिंग्जचे वर्चस्व
चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आतापर्यंत झालेल्या १४ सामन्यांत सनरायझर्स हैदराबाद टीमविरुद्ध वर्चस्व राखून ठेवता आले. टीमने यातील १० सामन्यांत विजयाची नाेंद केली आहे. त्यामुळे आता विजयाची ही माेहीम कायम ठेवण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.

चेन्नईचे ब्राव्हाे व सुरेश रैना यशस्वी
- हैदराबादविरुद्ध चेन्नईचा सुरेश रैना टाॅप स्काेअरर. त्याच्या नावे ४१५ धावा, ब्राव्हाेच्या १७ विकेट नाेंद आहे.
- चेन्नईविरुद्ध हैदराबादच्या वाॅर्नरच्या ३४८ धावा तसेच भुवनेश्वरने चेन्नईविरुद्ध आतापर्यंत ८ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...