आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध क्रिकेट समालोचक इयान चॅपल यांनी स्पीड स्टार उमरान मलिकबाबत मोठे वक्तव्य केले आहे. चॅपेल म्हणतात की, भारतीय संघ व्यवस्थापनाने गेल्या काही वर्षांत वेगवान गोलंदाजांचा एक पूल निश्चितच तयार केला आहे, परंतु आगामी काळात उमरान मलिकच्या वेगाकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.
जागतिक क्रिकेटमध्ये चॅपल यांच्या शब्दांचा खूप आदर केला जातो. क्रिकइन्फोच्या मते, ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार म्हणतो की, IPL मुळे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज भारतीय क्रिकेटमध्ये आले आहेत आणि हा ट्रेंड अव्याहतपणे सुरू आहे. IPL पाहणाऱ्यांच्या ओठावर फक्त गोलदांजीत स्पीड-स्टार उमरानचेच नाव असल्याचे चॅपलचे मत आहे.
चॅपलने भारतीय गोलंदाजीतील बदलाचे श्रेय दिले उमरानच्या आधीच्या पिढ्यांना
चॅपलचा असा विश्वास आहे की ज्या जगात वेगवान गोलंदाजांची किंमत केली जाते, त्या शर्यतीत टीम इंडिया सर्वात पुढे आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारताची टीम एक शक्तीशाली टीम बनली आहे. तिने अशाच निर्धाराने खेळी खेळत राहिल्यास आगामी काळातही ती जगात सर्वात अग्रेसर राहील.
टीम इंडियात वेगवान गोलंदाजी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि हेच कारण इतर संघांच्या ईर्षेचे बनू शकते. असे चॅपलचे मत आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांसारख्या वेगवान गोलंदाजांंमुळे परदेशात टीम इंडियाच्या वाढत्या दराराचे श्रेय इयान चॅपेल देतात. यासोबतच या कामगिरीबद्दल तो इशांत शर्मा, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्या भूमिकेचेही कौतुक करतात आणि त्याचे श्रेयपण देतात.
पूर्वी कठीण परिस्थितीत अनेक खेळाडू हार मानायचे
चॅपल यांनी 1969 मध्ये भारताला भेट दिली होती. ते मानतात की आता तो काळ निघून गेला आहे, जेव्हा काही भारतीय खेळाडू कठीण परिस्थितीत हार मानून खेळ सोडून द्यायचे. एक काळ असा होता की काही भारतीय खेळाडू फक्त कसोटीला येऊन ब्लेझर, स्वेटर आणि कॅप घालायचे. आता असा भारतीय संघ तयार झाला आहे, ज्याला कोणत्याही परिस्थितीत हरवणे फार कठीण आहे.
मात्र, याआधी टीम इंडियामध्ये वेगवान गोलंदाजांची नावे असायची, ज्यांच्याकडे वेगाची कमतरता होती. त्यानंतर IPL आली, ज्याने सध्याच्या वेगवान गोलंदाजांना समोर आणले. आता भारताकडे मजबूत फलंदाजी, धोकादायक आणि धारदार गोलंदाजी जी खूपच आक्रमक आहे. उमरानकडे जग किती कुतूहलाने पाहत आहे, हे दाखवण्यासाठी चॅपेल यांचे विधान पुरेसे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.