आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 2023ची उत्साहात सुरुवात झाली आहे. पाच संघांनी विजयासह स्पर्धेचा शुभारंभ केला आहे, तर उर्वरित संघांनी त्यांचे खाते उघडणे बाकी आहे. दिल्ली कॅपिटल्सदेखील 5 संघांपैकी एक आहे, ज्यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. DCने त्यांचा हंगामातील पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला, ज्यात त्यांचा 50 धावांनी पराभव झाला होता.
दिल्लीचा दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 4 एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीचा संघ सध्या त्यांच्या आगामी सामन्याच्या तयारीत व्यग्र आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा सलामीवीर पृथ्वी शॉचा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो मिड-ऑफमध्ये षटकार मारताना दिसत होता.
लखनऊ विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली संघाच्या फलंदाजांची कामगिरी खूपच खराब होती. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 193/6 धावा केल्या. प्रत्युत्तरात डीसीला संपूर्ण षटक खेळून 9 गडी गमावून केवळ 143 धावा करता आल्या. त्याचवेळी पृथ्वी शॉला नऊ चेंडूंत केवळ 12 धावा करता आल्या. शॉला स्पर्धेतील उरलेल्या सामन्यांमध्ये आपली गमावलेली लय पुन्हा मिळवायची आहे, त्यासाठी तो सराव सत्रांमध्येही मेहनत घेत आहे. फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, शॉ चांगल्या फॉर्मममध्ये दिसत होता. त्याने ईशांत शर्माच्या चेंडूवर मिड-ऑफमध्ये षटकार ठोकला.
लुंगी एनगिडी आणि एनरिक नॉर्टजे DC संघात
या स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे दोन प्रमुख खेळाडू संघात दाखल झाले आहेत. IPL 2023 मध्ये भाग घेण्यासाठी लुंगी एनगिडी आणि एनरिक नॉर्टजे भारतात पोहोचले आहेत. सोमवारी फ्रँचायझीने या दोन दिग्गजांच्या टीममध्ये सामील झाल्याची माहिती व्हिडिओद्वारे चाहत्यांशी शेअर केली.
दिल्लीला गुजरातकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचाय
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा हा केवळ दुसरा हंगाम आहे. पहिल्या सत्रात या संघाने अव्वल स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर साखळी फेरीत दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले होते. तो सामना गुजरातने जिंकला होता.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11...
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), विजय शंकर, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, राशिद खान, डेव्हिड मिलर, जेशुआ लिटल, यश दयाल आणि अल्झारी जोसेफ.
इम्पॅक्ट प्लेयर्स : केएस भरत, शिवम मावी, मोहित शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, मिचेल मार्श/रिले रुसो, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद आणि एनरिक नॉर्टजे.
इम्पॅक्ट प्लेयर्स : ललित यादव, मुकेश कुमार, अमन खान.
हेही वाचा
IPL मध्ये आज GT v/s DC:लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग-11
IPL 2023:लखनऊविरूद्ध धोनीचे षटकार, मैदान गुंजले; पण सोशल मीडियावर ट्रेंड झाला गौतम गंभीर, का ते वाचा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.