आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्णधार लाेकेश राहुलने (९१) सलामीला अर्धशतकी खेळी करून आपल्या पंजाब किंग्ज संघाला सोमवारी १४ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजयी गुढी उभारून दिली. पंजाब किंग्ज संघाने लाेकेश राहुल, दीपक हुडा (६४) आणि ख्रिस गेलच्या (४०) झंझावाती खेळीच्या बळावर लीगमधील आपल्या पहिल्या सामन्यात युवा कर्णधार संजू सॅमसनच्या राजस्थान राॅयल्सला पराभूत केले. पंजाबने ४ धावांनी सामना जिंकला. यासह पंजाब संघाला लीगमधील विजयी मोहिमेला दमदार सुरुवात करता आली. आता पंजाब किंग्जला शुक्रवारी याच मैदानावर धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे गुरुवारी राजस्थान आणि दिल्ली यांच्यात सामना हाेईल.
तुफानी फलंदाजीच्या आधारे पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या माेबदल्यात राजस्थान टीमसमाेर विजयासाठी २२२ धावांचे माेठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने ७ गडी गमावत २१७ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार संजू सॅमसनने दिलेली एकाकी झंुज सपशेल अपयशी ठरली. त्याने ११९ धावांची तुफानी खेळी केली.
कर्णधार लाेकेशचे अर्धशतक, गेलच्या ४० धावा
पंजाब किंग्ज संघाच्या आयपीएलमधील पहिल्या विजयासाठी कर्णधार लाेकेश राहुलने कंबर कसली. त्याने सलामीला येऊन झंझावाती अर्धशतक साजरे केेेले. त्याने ५० चेंडूंचा सामना करताना सात चाैकार आणि पाच षटकारांच्या आधारे ९१ धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या टीमच्या धावसंख्येला गती दिली. यादरम्यान त्याला तुफानी फटकेबाजी करणाऱ्या गेलची साथ मिळाली. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. गेलने ४० धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले.
नेतृत्वाच्या पदार्पणात संजू पहिला शतकवीर कर्णधार
राजस्थान राॅयल्स संघाचे पहिल्यांदाच कुशलपणे नेतृत्व करताना संजू सॅॅमसनने आयपीएलमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत यशस्वी पदार्पण केले. त्याने साेमवारी लाेकेश राहुलच्या पंजाब किंग्ज संघाविरुद्ध शतकी खेळी केली. त्याने नाबाद धावा काढल्या. यासह ताे नेतृत्वाच्या पदार्पणात शतकी खेळी करणारा पहिला कर्णधार ठरला. याच खेळीतून त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.