आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ipl
  • PUNJAB Vs SRH 14th IPL Match LIVE Score; KL Rahul David Warner Jonny Bairstow Chris Gayle | Chennai MA Chidambaram Stadium News | Punjab Kings Vs Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Cricket Score Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर चेन्नईत ‘सनराइज’:आयपीएल सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला 9 गड्यांनी हरवले

चेन्नई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादचा यंदाच्या मोसमातील पहिला विजय

आयपीएल २०२१ च्या सत्रातील १४ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जला ९ गड्यांनी हरवले. चालू सत्रात संघाचा पहिला विजय ठरला. दुसरीकडे, चेपॉक मैदानावरही हैदराबादने पहिला विजय नोंदवला. यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सर्व ६ सामन्यांत त्यांचा पराभव झाला होता. विजयानंतर हैदराबाद संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला. पंजाबचा हा तिसरा पराभव ठरला. संघ तालिकेत अखेरच्या स्थानी आहे.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव अखेरचे दोन चेंडू शिल्लक असताना १२० धावांवर संपुष्टात आला. मयंक अग्रवाल व शाहरुख खानने सर्वाधिक २२-२२ धावा काढल्या. निकोलस पूरन एकही चेेंडू न खेळता धावबाद झाला. चालू सत्रातील ४ डावांत तीन वेळा शून्यावर बाद झाला. हैदराबादसाठी खलील अहमदने ३ व अभिषेक शर्माने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात, हैदराबाद संघाने ८ चेंडू राखून व एक गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. वॉर्नरने (३७) पंजाबविरुद्ध खेळलेल्या गत १२ डावांत ३०+ धावा काढल्या आहेत. त्याने जॉनी बेअरस्टोसोबत पहिल्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो ६३ धावांवर नाबाद राहिला.

राहुल सर्वात वेगवान 5 हजार धावा करणार भारतीय
खेळाडू 5 हजार धावा
ख्रिस गेल 132 डाव
केएल राहुल 143 डाव
शॉन मार्श 144 डाव
बाबर आझम 145 डाव
अॅरोन फिंच 159 डाव

पंजाबची कामगिरी

हैदराबादच्या खलील अहमदने पंजाबला 3 झटके दिले. खलीलने आधी मयंक अग्रवाल नंतर फेबियन एलन आणि शाहरुख खानला आउट केले. एलन 6 आणि शाहरुख 22 धावांवर आउट झाले. याशिवाय, स्पिनर अभिषेक शर्माने पंजाबच्या दीपक हूडा आणि मोइसेस हेनरिक्सला माघारी पाठवले. हूडाने 11 बॉलमध्ये 13 तर, हेनरिक्स 17 बॉलमध्ये 14 रन काढले. याशिवाय, फेबियन एलन 11 बॉलमध्ये 6 रन काढून आउट झाला.

निकोलस पूरन आणि क्रिस गेल पुन्हा फेल
भुवनेश्वर कुमारने कर्णधार लोकेश राहुल(4 रन)च्या रुपात संघाला पहिला झटका दिला. यानंतर आठ धावांच्या आत मयंक अग्रवाल, निकोलस पूरन आणि क्रिस गेल आउट झाले. मयंकने(22 रन),पूरन(0रन) आणि गेलने(15रन) काढले. गेलला राशिदने LBW केले.

दोन्ही संघ
पंजाब:
लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरूख खान, फैबियन एलेन, एम अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, विराट सिंह, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.

बातम्या आणखी आहेत...