आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनरायझर्स हैदराबाद संघाचा 72 धावांनी पराभव:विक्रमी फलंदाजीने राजस्थान राॅयल संघ विजयी; 7.2 षटकांत वेगवान 100 धावा

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर जाेस बटलर (५४) आणि यजुवेंद्र चहलने (४/१७) राजस्थान राॅयल्स संघाला रविवारी १६ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये दणदणीत विजय मिळवून दिला. यशस्वी जयस्वाल (५४), बटलर (५४) आणि कर्णधार संजु सॅमसनच्या (५५) विक्रमी फलंदाजीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने राॅयल विजयाची नाेंद केली. सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान संघाने लीगमधील आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये भुवनेश्वर कुमारच्या यजमान सनरायझर्स हैदराबाद टीमचा पराभव केला. राजस्थान संघाने ७२ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने पाच गड्यांच्या माबेदल्यामध्ये यजमान हैदराबाद टीमसमाेर विजयासाठी २०४ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. चहल पाठाेपाठ ट्रेंट बाेल्ट (२१/२), हाेल्डर (१/१६) आणि अश्विनच्या (१/२७) गाेलंदाजीमुळे दमछाक झालेल्या यजमान हैदराबाद संघाला घरच्या मैदानावर ८ गडी गमावत अवघ्या १३१ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाकडून अब्दुल समदने सर्वाधिक नाबाद ३२ आणि मयंक अग्रवालने २७ धावांची खेळी केली. इतर फलंदाज घरच्या मैदानावर सपशेल अपयशी ठरले.

राजस्थानच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करताना तुफानी फटकेबाजी केली. यामुळे संघाला पावरप्लेमध्येच माेठा स्काेअर उभा करता आला. हे लक्ष्य गाठताना यजमान हैदराबाद संघाची माेठी दमछाक झाली.

बाेल्ट-चहलमुळे हैदराबाद अपयशी वेगवान गाेलंदाज ट्रेंट बाेल्ट आणि यजुवेंद्र चहलच्या शानदार खेळीमुळे यजमान हैदराबाद संघाचा घरच्या मैदानावरील विजयी सलामीचा प्रयत्न अपयशी ठरला. यामुळे टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. टीमची प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना भाेपळाही फाेडता आला नाही. यादरम्यान मयंकने संयमी खेळीतून २७ धावा काढल्या. मात्र, वाॅशिंग्टन (१), फिलीप्स (८) आणि कर्णधार भुवनेश्वर (६) झटपट बाद झाले.

आघाडीच्या फळीची राॅयल खेळी; तीन अर्धशतके; १४० चा स्ट्राइक रेट राजस्थान राॅयल्स संघाने रविवारी लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादच्या मैदानावर दमदार सुरुवात केली. संघाच्या आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जायस्वाल, सामनावीर जाेस बटलर आणि कर्णधार संजु सॅमसनने तुफानी खेळीतून वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. यशस्वी आणि बटलरने संघाला ८५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. बटलरने २२ चेंडूंमध्ये ७ चाैकार व ३ षटकारांसह ५४ धावांची वेगवान खेळी केली.

चहलची विक्रमात मलिंगाशी बराेबरी राजस्थान राॅयल्स संघाच्या यजुवेंद्र चहलने सामन्यात शानदार गाेलंदाजीतून चार बळी घेतले. यासह त्याने आयपीएलमध्ये १७० बळी पुर्ण केले. यासह त्याने श्रीलंकन गाेलंदाज मलिंगाच्या विक्रमाशी बराेबरी साधली. आता हे दाेघेही प्रत्येकी १७० विकेटसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राव्हाेच्या नावे सर्वाधिक १८३ बळींची नाेंद आहे. चहलने आयपीएलमध्ये पाचव्यांदा डावात चार बळी घेतले आहेत.