आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुन्हा एकदा सहाव्या व सातव्या क्रमांकावरील फलंदाज संघाच्या विजयाचे हीरो ठरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहाव्या क्रमांकावरील शाहबाज अहमद (२६ चेंडूत ४५ धावा) आणि सातव्या स्थानावरील दिनेश कार्तिकने (२३ चेंडूत ४४ धावा) राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४ गड्यांनी विजय मिळवून दिला. १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने ८७ धावांत ५ गडी गमावले होते. त्यांना ४२ चेंडूंत ८२ धावांची गरज होती. खेळपट्टीवर होते शाहबाज व कार्तिक. दोघांनी तुफानी फटकेबाजी करत सहाव्या गड्यासाठी ३३ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. बंगळुरूचा हा आयपीएलमधील १०० वा विजय ठरला. अशी कामगिरी करणारा हा चौथा संघ बनला. तत्पूर्वी, राजस्थानच्या बटलरने ७०* धावा केल्या. पड्डीकलने ३६ धावा जोडल्या.
धावफलक, नाणेफेक बंगळुरू (गाेलंदाजी)
राजस्थान रॉयल्स धावा चेंडू ४ ६
जोस बटलर नाबाद ७० ४७ ०० ६
जयस्वाल त्रि. गो. व्हिले ०४ ०६ ०० ०
पड्डीकल झे. कोहली गो. पटेल ३७ २९ ०२ २
संजू सॅमसन झे .गो. हसरंगा ०८ ०८ ०० १
शिरोम हेटमायर नाबाद ४२ ३१ ०४ २
अवांतर : ८, एकूण : २० षटकांत ३ बाद १६९ धावा. गडी बाद क्रम : १-६, २-७६, ३-८६. गाेलंदाजी : मो. सिराज ४-०-४३-०, डेव्हिड व्हिले ४-०-२९-१, आकाशदीप ४-०-४४-०, वनिंदू हसरंगा डीसिल्वा ४-०-४४-१, हर्षल पटेल ४-०-१८-१.
रॉयच चॅलेंजर्स बंगळुरू धावा चेंडू ४ ६
डु प्लेसिस झे. बोल्ट गो. चहल २९ २० ०५ ०
रावत झे. सॅमसन गो. सैनी २६ २५ ०४ ०
विराट कोहली धावबाद ०५ ०६ ०० ०
व्हिले त्रि. गो. चहल ०० ०२ ०० ०
रुडरफोर्ड झे. सैनी गो. बोल्ट ०५ १० ०० ०
शाहबाज त्रि. गो. बोल्ट ४५ २६ ०४ ३
दिनेश कार्तिक नाबाद ४४ २३ ०७ १
हर्षल पटेल नाबाद ०९ ०४ ०० १
अवांतर : १०, एकूण : १९.१ षटकांत ६ बाद १७३ धावा. गडी बाद क्रम : १-५५, २-६१, ३-६२, ४-६२, ५-८७, ६-१५४. गाेलंदाजी : ट्रेंट बोल्ट ४-०-३४-२, प्रसिद्ध कृष्णा ४-०-४०-०, अश्विन ४-०-३९-०, युजवेंद्र चहल ४-०-१५-२, नवदीप सैनी ३-०-३६-१, यशस्वी जयस्वाल ०.१-०-६-०.
सामनावीर : दिनेश कार्तिक
आयपीएल-2022 गुणतालिका
संघ लढत विजय पराभव टाय NR गुण रनरेट
राजस्थान रॉयल्स 3 2 1 0 0 4 +1.218
कोलकाता नाइट रायडर्स 3 2 1 0 0 4 +0.843
गुजरात टायटन्स 2 2 0 0 0 4 +0.495
पंजाब किंग्ज 3 2 1 0 0 4 +0.238
लखनऊ सुपर जायंट्स 3 2 1 0 0 4 +0.193
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 3 2 1 0 0 4 +0.159
दिल्ली कॅपिटल्स 2 1 1 0 0 2 +0.065
मुंबई इंडियन्स 2 0 2 0 0 0 -1.029
चेन्नई सुपरकिंग्ज 3 0 3 0 0 0 -1.251
सनरायझर्स हैदराबाद 2 0 2 0 0 0 -1.825
डीकेच खरा चेज मास्टर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिनेश कार्तिक आपल्या संघाचा गोल्डन खेळाडू आहे. त्याने संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्याने आपल्या फलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले. कार्तिक पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो खरा चेज मस्टर आहे. तो टी-२० मध्ये लक्ष्याचा पाठलाग करण्यात पटाईत आहे. त्याने योग्य वेळी शाहबाजला अनुभवी मार्गदर्शन केले. शाहबाज त्या पद्धतीने खेळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.