आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामना 52 वा:राजस्थान रॉयल्सचा सातवा विजय; पंजाबवर 6 गड्यांनी केली मात, जस्थानचा शेवटच्या षटकात विजय

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्पल कॅप होल्डर युजवेंद्र चहलची (३/२८) शानदार गोलंदाजी आणि सामनावीर यशस्वी जैस्वालच्या (६८) झंझावाती फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये सातवा विजय संपादन केला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने आपल्या ११ व्या सामन्यामध्ये मयंक अग्रवालच्या पंजाब किंग्जला १९.४ षटकांत धूळ चारली. राजस्थान संघाने शेवटच्या षटकांत सहा गड्यांनी विजय साकारला.

जॉनी बेअरस्टोच्या (५६) अर्धशतकी खेळीतून पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात विजयश्री खेचून आणली. यादरम्यान राजस्थान संघाने विजयासाठी पाच उत्तुंग षटकार खेचले. यासह राजस्थान संघाने यंदाच्या सत्रामध्ये षटकारांचे शतक साजरे केले. यंदा १०० षटकार पूर्ण करणारा राजस्थान हा पहिला संघ ठरला.

बातम्या आणखी आहेत...