आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा स्पिनर्स राशीद खानने हॅटट्रिक घेतली. आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक करणारा राशिद खान हा तिसरा कर्णधार आहे. याआधी युवराजसिंग आणि शेन वॉटसन यांनाच ही कामगिरी करता आली. दरम्यान, राशिदच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया- आयपीएलच्या इतिहासात एकूण 19 गोलंदाजांनी हॅटट्रिक केली आहे.
आधी पाहा राशिद खान याने घेतलेली हॅटट्रिकचा VIDEO
हॅट्ट्रिकनंतरही गुजरात टायटन्सच्या पदरी निराशा
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली. लेगस्पिनर राशीदने डावाच्या 17व्या षटकात आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांना बाद करून ही कामगिरी केली. तसेच राशिद खानच्या हॅट्ट्रिकनंतरही गुजरात टायटन्सला सामन्यात तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामागचे कारण होते रिंकू सिंहचे शेवटच्या पाच चेंडूंवर षटकार ठोकून केकेआरला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
आयपीएलच्या इतिहासात 22 वे हॅटट्रिक
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील ही 22 वी हॅटट्रिक होती. आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 गोलंदाजांनी हॅटट्रिक केली आहे. 40 वर्षीय लेगस्पिनर अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये तीन हॅट्ट्रिक करणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (2008), डेक्कन चार्जर्स (2011) आणि सनरायझर्स हैदराबाद (2013) साठी हॅटट्रिक घेतली. युवराज सिंगने एकाच हंगामात 2 हॅट्ट्रिक्स केल्या होत्या. आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक करणारा राशिद खान हा तिसरा कर्णधार आहे. याआधी युवराजसिंग आणि शेन वॉटसन यांनाच कामगिरील करता आली होती.
IPL: अमित मिश्राच्या तीन हॅटट्रिक
युवराजच्या एकाच हंगामात दोन हॅट्रिक
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) कडून खेळताना एकाच हंगामात दोन हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम केला आहे. 2009 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध हॅटट्रिक घेतली, तर त्याच वर्षी डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना युवराजने दुसरी हॅटट्रिक घेतली.
रोहित शर्मानेही घेतली आहे हॅट्ट्रिक
आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्माचे नावही सामील आहे. रोहितने आयपीएलमध्ये कमी गोलंदाजी केली आहे. शेवटच्या वेळी त्याने 2014 च्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली होती. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. त्या मोसमात रोहितने हॅट्ट्रिकसह 11 विकेट घेतल्या होत्या. रोहित ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो, त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 15 विकेट घेतल्या आहेत.
बालाजीने पहिल्याच हंगामात घेतली हॅटट्रिक
आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम लक्ष्मीपती बालाजीच्या नावावर आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात त्याने हॅट्ट्रिक करून सर्वांना चकित केले होते. 10 मे 2008 रोजी, त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ही कामगिरी केली. त्या सामन्यात त्याने इरफान पठाण, पियुष चावला आणि व्हीआरव्ही सिंगला लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.
आयपीएल हॅटट्रिक्सची यादी-
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.