आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराशीद खान (४/२४), यश दयाल (२/२४) आणि रवी साई किशोरने (२/७) शानदार गोलंदाजीतून गुजरात टायटन्स संघाचा यंदाच्या आयपीएलमधील प्लेऑफचा प्रवेश निश्चित केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने लीगमधील आपल्या १२ व्या सामन्यामध्ये नंबर वन लखनऊ संघाचा धुव्वा उडवला. गुजरात संघाने १३.४ षटकांत ६२ धावांनी धडाकेबाज विजयाची नोंद केली.
सामनावीर शुभमान गिलच्या (६३) नाबाद अर्धशतकाच्या बळावर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात लखनऊसमोर विजयासाठी १४५ धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरामध्ये लखनऊ संघाची अवघ्या ८२ धावांमध्ये दाणादाण उडाली. संघाकडून दीपक हुडाने सर्वाधिक २७ धावांची खेळी केली. संघाचे सात फलंदाज एकेरी धावावर बाद झाले. यासह गुजरात संघाने अव्वल स्थान गाठले. प्लेऑफमध्ये दाखल झालेला गुजरात यंदा पहिला संघ ठरला. लखनऊला चाैथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
एमसीएच्या खेळपट्टीवर फिरकीची जादू
वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या एमसीएच्या खेळपट्टीवर राशिद खानने आपल्या फिरकीची जादू केली. त्याने ३.५ षटकांत अवघ्या २४ धावा देताना चार बळी घेतले. यासह अफगाणिस्तानच्या या सुपरस्टार गोलंदाजाने टी-२० फाॅरमॅटमध्ये जगातील सर्वात्तम स्पिनर असल्याचे सिद्ध केले. तसेच डावखुऱ्या साई किशोरने दोन षटकांत ७ धावा देताना दोन विकेट घेतल्या.
धावफलक, नाणेफेक गुजरात (फलंदाजी) गुजरात टाययन्स धावा चेंडू ४ ६ वृद्धिमान झे.आवेश गो. मोहसिन ०५ ११ ०१ ० शुभमान गिल नाबाद ६३ ४९ ०७ ० मॅथ्यू वेड झे.डिकॉक गो. आवेश १० ०७ ०२ ० हार्दिक झे.डिकॉक गो. आवेश ११ १३ ०० ० मिलर झे. आयुष गो. होल्डर २६ २४ ०१ १ राहुल तेवाटिया नाबाद २२ १६ ०४ ० अवांतर : ०७, एकूण : २० षटकांत ४ बाद १४४ धावा. गडी बाद क्रम : १-८, २-२४, ३-५१, ४-१०३ गोलंदाजी : मोहसिन खान ४-०-१८-१, दृष्यमंथा चमिरा ४-०-३४-०, आवेश खान ४-०-२६-२, कृणाल ४-०-२४-०, जेसन होल्डर ४-०-४१-१. . लखनऊ सुपरजांयट्स धावा चेंडू ४ ६ क्विंटन डिकॉक झे.साई गो. यश ११ १० ०० १ लाेेकेश राहुल झे.साहा गो. शमी ०८ १६ ०१ ० दीपक हुडा झे.शमी गो. राशिद २७ २६ ०३ ० करण शर्मा झे. मिलर गो.यश ०४ ०४ ०१ ० कृणाल यष्टी. साहा गो. राशिद ०५ ०५ ०१ ० आयुष यष्टी.साहा गो. साई ०८ ११ ०१ ० स्टाेईनिस धावबाद ०२ ०२ ०० ० जेसन होल्डर पायचीत गो.राशिद ०१ ०२ ०० ० मोहसिन खान झे.राशिद गो. साई ०१ ०३ ०० ० दृष्यमंथा चमिरा नाबाद ०० ०० ०० ० आवेश खान झे.साहा गो. राशिद १२ ०४ ०० २ अवांतर : ०३, एकूण : १३.५ षटकांत सर्वबाद ८२ धावा. गडी बाद क्रम : १-१९, २-२४, ३-३३, ४-४५, ५-६१, ६-६५, ७-६७, ८-७०, ९-७०, १०-८२. गोलंदाजी : मो. शमी ३-०-५-१, हार्दिक १-०-८-०, यश दयाल २-०-२४-२, अल्झारी जाेसेफ २-०-१४-०, राशिद खान ३.५-०-२४-४, साई २-०-७-२. सामनावीर : शुभमान गिल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.