आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनची पत्नी प्रीतीने सांगितली तिची लव्हस्टोरी:म्हणाली- अश्विनचे माझ्यावर सुरुवातीपासूनच क्रश होते, हे सर्व शाळेत माहित होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान रॉयल्सचा ऑफ स्पिन अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने या आयपीएल हंगामात आतापर्यंत 9 सामन्यांत 13 बळी घेतले आहेत. अश्विन आपल्या संघासाठी सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे. अश्विनची पत्नी प्रीती नारायणन ही गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मोठी ताकद आणि सपोर्ट सिस्टीम आहे. ती प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचू शकत नाही, परंतु ती आर अश्विनचा प्रत्येक सामना न चुकता टीव्हीवर पाहते.

प्रीती नुकतीच जिओ सिनेमावर मॅच सेंटर लाइव्ह या हँगआउट शोमध्ये आली होती. सानिया मिर्झा, वेदा कृष्णमूर्ती आणि दानिश सैत यांनी हा शो होस्ट केला होता. शोमधील चर्चेदरम्यान प्रीतीने अश्विनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल व लव्हस्टोरीबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

प्रीती म्हणाली- एकाच शाळेत शिकलो
प्रीती म्हणाली- अश्विन आणि मी एकाच शाळेत शिकलो. तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आम्ही सातवीपासून एकमेकांना ओळखत होतो. त्याचा माझ्यावर पहिल्यापासूनच क्रश होता आणि हे सगळ्या शाळेला देखील माहीत होते. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तो इतर शाळांमध्ये गेला. मात्र, आम्ही वाढदिवसासह अन्य फंक्शनच्या माध्यामातून संपर्कात राहिलो.
मधल्या काळात आमचे भेटणे कमी झाले. मात्र, नंतर आम्ही पुन्हा भेटलो. जेव्हा मी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे खाते सांभाळत होते. तेव्हा मी त्याला पुन्हा भेटले आणि अचानक मी त्याला सहा फुटांचा क्रिकेटर म्हणूनच पाहिले.

यासोबतच अश्विनने तिला कसे प्रपोज केले होते हे देखील प्रीतीने सांगितले. प्रीती पुढे म्हणाली, 'एकदा तो मला क्रिकेटच्या मैदानावर घेऊन गेला आणि म्हणाला की मी माझ्या आयुष्यात फक्त तुलाच पसंत केले आहे आणि 10 वर्षात तीळमात्र देखील बददले नाही.

13 नोव्हेंबर 2011 ला अश्विन-प्रीती लग्नाच्या बेडीत अडकले
आर अश्विनने 13 नोव्हेंबर 2011 रोजी प्रीती नारायण सोबत लग्न केले. पूर्ण विधी करून त्यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला काही मोजकेच लोक उपस्थित होते.