आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL मधून खेळाडूंची माघार:रविचंद्रन अश्विनची आयपीएलमधून माघार, कोरोना काळात कुटुंबियांसोबत राहण्याची इच्छा

चेन्नई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. दररोज 3 लाखांपेक्षा जास्त संक्रमित लोक आढळून येत आहेत. मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशात इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरु आहे. परंतु आता काही मोठे खेळाडू या महामारीमुळे टुर्नामेंटमधून माघार घेत आहेत. रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलर अँड्र्यू टायने टुर्नामेंटमधून बाहेर पडण्याचे निश्चित केले आहे.

सोशल मीडियावर दिली माहिती
दिल्लीचा हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये झालेल्या विजयानंतर अश्विनने सोशल मीडियावर लीगमधून बाहेर पडत असल्याची माहिती दिली. अश्विनने सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि इतर नातेवाईक सध्या कोरोनाशी लढत आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये मला त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा आहे. परिस्थिती सुधारल्यास मी पुन्हा खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...